Holiday in Bali
बाली विनोदयात्रा
Dakshini Marathi Khajana
दक्षिणी मराठी खजाना
Articles List II Index
Click on your choice
6. World Sparrow Day
by Vasantha Hanumantha Rao
Voice Clip
विश्व चुमणी दिवस World Sparrow Day (21st March)
मी वसंता हनुमंतराव म्हणून चेन्नैंत्सून बोलतें. आज येऊन World Sparrow Day. ते Sparrow म्हणजे अमच॑ गोष्टींत (दक्षिणी मराठींत) चुमणी म्हणून म्हणणे. हे चुमणी म्हणाच अमच॑ चुम्मण वयेंत अग्गीन ते तेवढ अमच बरोर तेयीन मिळून आलत॑ एक जावराशी ग. तेवढ॑ अस्कदनालीन अवडल॑. घरांतच॑ फिरून फिरून, अंगणांत फिरून फिरून येईल. अमच॑ थोरळे अग्गीन तांदूळ सूपांत ठींगून अंगणांत बसून वेंचतील. चुमणी येऊन खाईलकी म्हणून तजांत याच साळी बाकी दाणे अग्गीन तस-तसच॑ भिर्कावतील. उडून येऊन गुंप गुंप विणी उडू्न उडून येऊन चुमणी खावसुडून जाईल. तसच अंगणांत उखळ, रुब्बगुंड अग्गीन असेल॑. ते रुब्बगुंड, तजांत पाणी असेल॑, ते पाणी वेगळ॑ पिवसुडून शब्द करत चुम्मण चुम्मण पंखा उडींगत उडून जायाच पाह्याला फार चांगळ असेल. फार बेष असेल. अम्हाल लेंकरांस अग्गीन चुमणी कावळा दाखिवनच॑ भात घालतील॑, पाणी पाजिवतील॑, दूध पीविवतील॑ अग्गीन करतील॑. ते चुमणी व॑र दंड गाणे अग्गीन वेगळ॑ सांगतील. तेवढे बेष असेल ग. अत्ता कोट्ठ॑ हे चुमणी अग्गीन पाह्यालाच होत नाही. हे टेक्नोलजीमळ, चुमणीच अत्ता उदंड उदंड उण होऊनगेलाहे. अमच घरच कवला व॑र चरटा व॑र अग्गीन ते nest बांधेल. तेवढ बेष असेल, ते nest बांधून, तजांत अंडा अग्गीन ठींगून, ते येऊन तेवढ॑ बेष पाह्यींगून, ते hatch करून, ते पिल्लूला अग्गीन ते उडजोरी तेवड बेष पाह्यींगलमा. अत्ता कोठ पाह्णे हे अग्गीन ? अमच लेंकरांना अग्गीन, इथपर याच लेंकरांना अग्गीन हे गूगल हेजांत्सूनच दाखिवाम, अस एक होत म्हणून. शेवटी काय, अम्हाला तस पापांव म्हणजे कोठतरीन दूर खेडे गांवापटीस गेलों म्हणजे, जुन॑ घर फाडून बांधनास असलतर, तेथ पाव्हूया चुमणी. तेच.