Holiday in Bali
बाली विनोदयात्रा
Dakshini Marathi Khajana
दक्षिणी मराठी खजाना
दक्षिणी मराठी एक भाषाका, नाही अपभ्रंशका ?
This article was first published in SIMA's 33rd Formation Day Souvenir
voice clip
हेला उत्तर द्याच॑ पुढ॑ एक सांगतों. मी ल्हान असताना, अमच॑ कुटुंब॑ अनंतशयनमांत्सून (तिरुवनंतपुरमांत्सून) चेन्नैला स्थिीर होऊन राह्याला गेल॑.
मला तमिल थोड॑-थोड॑ येत होत॑, तरीन॑ अमच॑ नव॑ कामवाली पोन्नम्माच॑ तमिल मला अर्थ कराला झाल॑ नाही. पण, तिज॑ लेंकीच॑ तमिल मला सुलभांत॑ अर्थ होत होत॑. कां ते ?
डोस्के फोडाच॑ प्रश्न काहीं नोहो हे. मायाला लिव्हालीं वाचालीं येत होत॑ नाही, पण लेंक साळेला जात होती. हेजमळे मायाच भाषा शुद्ध नोहोत॑, पण लेंकीच भाषा शुद्ध झाल॑. भाषाचीं अपभ्रंशाचीं व्यत्यास हेच ; विद्याभ्यास, म्हणजे लिव्ह्णे अणी वाचणेच अभ्यास.
तंजावूर मराठी पोन्नम्माच॑ तमिलाच॑ गेताला कस॑ येऊन पावल॑ ? खर॑ सांगांम॑ म्हणजे, अम्ही अग्गिदनीं हेला जवाबदारीच॑. गेलत॑ एक-एक पिढीहीं.
पोन्नम्मास्क॑च, अम्हालपणीं अमच॑ भाषा वाचालीं लिव्हालीं कळना. मझ॑ पिढींतल॑ लोकांस॑, ते वेळी तमिलनाडांत॑ होत होत॑ ते हिंदी-विरुद्ध प्रकटनामळे देवनागरी लिपी शिकाला झाल॑ नाही. पण, अमच॑ लेंकरे-नातोंडे यांस॑ असलत॑ अडचण काहीं आहे का ?
अत्तच॑ हे काळांत चोखोट उद्योग मिळाम॑ म्हणजे दक्षिणी मराठी शिकलतर॑ प्रयोजन काहीन नाही. हे अग्गिदनालीन कळ्ळतेच॑. तरीन॑, अमच॑ भाषाला अवगणना अम्हीच करूया का ? तस अवगणना करलतर॑ ते अण्खीन जास्ती अपभ्रंश होईल. हे होयाला सोडताने. संस्कारावरीं पार्यंपरावरीं फार॑ गौरव अणी अभिमान असणार अम्ही हे होयाला सोडताने. फारेच वेगळ॑ वर्गाच भाषाच॑ वातावरणांत॑ असून पणीन साडेतीनशें वर्षावर॑ अमच॑ भाषा वांचून आलाहे म्हणून॑ कळींगून अम्ही हे होयाला सोडताने.
अमच॑ भाषा एक अपभ्रंश॑ अस॑ अमचमध्ये कोणाल-कोणाला वाटत॑ की, त्यांस अग्गीन ते एक अपभ्रंशास्कच वाटेल॑. दक्षिणी मराठीला एक भाषाच लक्षण आहे अस॑ वाटणारांस ते भाषास्क॑च दिसेल॑.
पोन्नम्माच॑ लेंक दाखिवलित्यास्क॑ दक्षिणी मराठी सुधाराम म्हणजे अम्ही अमच॑ भाषा शिकलतरेच होईल॑.
या, दक्षिणी मराठी लिव्हालीं वाचालीं प्रयत्न करूम्हणे.