top of page
home-button.png

स्मरण संपुष्ट 7

DM 1 (with spellings as spoken in his home)  are by RR.

The re-written DM 2 version, with standardized DM spellings are by Ananda Rao Vasishta.

by Rajaram Ramachandran

1 st May 2019

DM 2 

तुमच॑ घरांत कृष्णाच पट असेल.  बालकृष्ण तोंडांतसून् लोणी गळास्क वाढिवलते माये यशोदाल टेंकिंगून ओठाकलास्क असेल.  यशोदाम्मा लोणी काढाकरतां विरदनघाट्लते दही वोर्ल साये काढून एक मडकेंत घालून रवी वाटे घुसळत अस्तील. असच वीदिविडंगन घरांत लोणी काढतील. वीदिविडंगन घरांत थोर आंगण, आंगणाच दोनी पटीसयिन लांब रुंद वसरी. वसरींत वळीन मोट्ट मोट्ट कांब, एक एक कांबयिन दोन हातावाटे मिळिवून धराला होईना. संपाक खोलींतयीन तसलते तीन कांब. त्यांत एक कांबांत खाले वोर दोरा बांधून खाले मडके ठिऊन घुसळास्क असेल. मडके भोईला लागताने, मडके लमंडताने. काय करणे ?  दोन मूठ गवत काढून गुंडाळून त्याज वोर नारळी शेंडीच चरांट फिरिवून मडके बसास्क ठिवलसतील. मडकेंत विरदण घाट्लते दही वोरल॑ साये घालून रवी दोरा वाटे अडकिवून घुसळाच पाह्याला नीट असेल.  बरोर लोणी मिळून येताना घुसळणे राहत॑ करुन लोणी काढतील. हाताला चिकटनास्क लोणी मिळुन येताना काढूनटाकांव, नाहीतर॑ लोणी मिळ्ळत ताकच प्यांव. (कॉफी दाणे घरांत भाजताना बरोरल॑ समयांत तेलतवांतसून काढूनटान्टाकांव. पुढे काढलतर॑ कॉफीला अडव वास येईल, सोडून काढलतर॑ करपलते वास येवूनजाईल. तसच लोणियिन, बरोर मिळून येताना काढूनटाकांव)

लोणी घुसळाच पाह्यिलतर॑ आराराल घुसळांव म्हणून वाटेल.  लोक्कर लोक्कर घुसळून आरार केवढकी मडके मोडकाये.

पल्लवपुरमांत कस ?  वसिरींतकी, जेवाच ठिकाणांतकी, देवघरांतकी, संपाकखोलींतकी कांब एक पणीन नहोत. कोनडा थोर थोर असेल. ओंटा वोर वळीन कांब असेल. आंगणाच एक पटीस उनुपाणीच चूल (हंडाच चूल म्हणतील) असेल. त्याज वोरच मडकेंत म्हैशीच दूध तावतील.  एक बायको, वेण्डैक्काय (भेंडा) म्हणून नांव, येऊन तावल. विरदन घालणे, लोणी काढणे अस्कीन घरच॑ बायका. एक शीश लावलते पित्तळाच अडकांत साये काढून घालून घुसळून लोणी काढतील. अस काढाच लोणी संपाकाला.  गायीच दूध घरच॑ बायका कॉफी घालाच चूलींत तावून विरदन घालून लोणी काढून तावलते तूप देवाच दिवा लावाल ठींगतील.

मागे लिवाच: अक्षर चूक असूया, अर्थ समझल॑ म्हणींगतो आरार.  वर्ष एकोण्णीस साठींत देवनागरी लिपींत अक्रवींत नंखर लिवलते, संस्कृत वाचला म्हणून नांव की विना पोणावंटा लिवण अस्कीन तमिलांतच. राम शब्द, स:, तौ, ते; तम्, तौ, तानु; तेन, ताब्याम्, तैही; तस्मै, ताब्याम्, तेबय:, विग्रह वाक्य, तेवढेच देवनागरी लिपींत लिवणे. वाचाल कळल, लिवून दंडक नाही. उदंड दिवसान्तसून गुरूजी श्री आनन्द रावजी वशिष्ट सांगत होते, आराराल म्हैशीच काताड नहोका, रुचल नाही.  नंतर भरून दन सांगिट्ले, सुश्री चन्द्रिका जी, श्री महेश जोशी जी, श्री गुरुमोहन जी वगैरा सांगिट्लतामळ हे प्रयत्न, क्षमा करा. बरोर कराल पंतोजीला वेळ नाही. 


    

DM 1

तुम्च घरांत कृष्णाच पट असल।  बालकृष्ण तोण्डांतसून् लोणी गळास्क वाडिवल्ते माये यशोदाल टेंकिंगुन् ओटाक्लास्क असल।  यशोदाम्मा लोणी काडा कर्तान् वृदंगाट्लते दहीवोर्ल साये काडुन् एक मड्कांत गालुन् रवी वाटे गुसळत अस्तील।  असच वीदिविडन्गन् घरांत लोणी काड्तील।  वीदिविडन्गन् घरांत तोर आंगण, आंगणाच दोनी पटीसयिन् लाम्ब रुन्द वस्री।  वस्रींत वळीन मोट्ट मोट्ट काम्ब, एक एक काम्बयिन् दोने हातावाटे मिळिवुन् दराल होय्ना।  सम्पाक खोलींतयीन् तसल्ते तीन् काम्ब।  त्यांत एक काम्बान्त काले वोर दोरा बान्दुन् कल्ले मड्क टिवुन् गुसलास्क असल।  मड्क भोयील लाग्ताने, मड्क लमंड्ताने।  काये कर्न?  दोने  मूट गवत काडुन् गुण्डाळुन् त्याज वोर नार्ळी शेण्डीच चरांट पिरिवुन् मड्क बसास्क टिव्लास्तील।  मड्कांत वृदंगाट्लते दही वोर्ल साये गालुन् रवी दोरा वाटे अड्किवुन् गुसळाच पायाला नीट असल।  बरोर लोणी मिळुन् एतान गुसळ्न रात करुन लोणी काड्तील।  हाथाला चिकट्नास्क लोणी मिळुन् एतान काडुन्टाकांव, नाहित्र लोणी मिळ्ळत ताकच प्यांव।  (काफी दाने घरांत बाज्तान बरोर्ल समयांत तेल्तवांतसून् काडुन्टाकावन्, पुड काड्लत्र काफील अडव वास एयिल, सोडून् काड्लत्र करप्पल्त वास एवुन्जायिल।  तसच लोणियिन्, बरोर मिळुन् एतान काडुन्टाकांव।)

लोणी गुसळाच पायिल्त्र आराराल गुसळांव मणून् वाटल।  लौकर लौकर गुसळून् आरार केव्डकी मड्क मोड्लाये।

पल्लवपुरमान्त कस?  वसिरींतकी, जेवाच ठिकाणांतकी, देवघरांतकी, समपाक्खोलींतकी कांब एक पिणी नहोत।  कोनडा तोर् तोर् असल।  ओंठा वोर वळीन कांब असल।  आंगणाच एक् पटीस उनप्पाणीच चूले, अण्डाच चूले मण्तील, असल, त्याज वोरच मड्कांत मैसीच दूध ताव्तील।  एक बाय्को, वेण्डैक्काय (बेण्डा) मणून् नांव, एवुन् तावल।  वृदन्गाल्न, लोणी काड्न अस्कीन् घर्च बाय्का।  एक शीश लावल्ते पित्तळाच अडकान्त साये काडुंगालुन् गुसळून् लोणी कांड्तील।  अस काडाच लोणी सम्पाकाला।  गायीच दूध घर्च बाय्का काफी गालाच चूलींत तावुन् वृदंगालुन् लोणी काडुन् तावल्त तूप देवाच दिवा लावाल टींग्तील।

मांग लिवाच: अक्षर चूके असुया, अर्थ सम्झल मणिंग्तो आरार्।  वर्ष एकोण् वीस् एकोण् साटींत देवनागरी लिपींत अक्रवींत नंखर लिवल्त, सम्स्कृत वाच्ला मणून् नांव की विना पोणावण्टा लिवण अस्कीन तमिलांतच।  राम शब्द, स:, तौ, ते; तम्, तौ, तानु; तेन, ताब्याम्, तैही; तस्मै, ताब्याम्, तेबय:, विग्रह वाक्य, तौडच देवनागरी लिपींत लिव्ण।  वाचाल कळल, लिवुन् दण्डक नाहि।  उदण्ड दिवसान्तसून् गुरूजी श्री आनन्द राव्जी वशिष्ट सांगत होते, आराराल मैशीच खाताड नहोका, रुचल्नी।  नन्तर भरून् दने सांगिट्ले, सुश्री चन्द्रिका जी, श्री महेश जोशी जी, श्री गुरुमोहन् जी वगैरा सांगिट्लतामळ हे प्रयत्न, क्षमा करा।बरोर् कराल पंतोजील वेळ नाहि। 

bottom of page