top of page
home-button.png

नुस्त असेच -  13

In this set of fifteen writings RR  takes us through some stray thoughts, ideas and events in a casually serious tone   

सोवळेच काठी (v.2)
(re-written in DM script by ARV)

नंखर रुब्बलते पीठ उरल॑ होत॑, त्याज बरोर कोरड॑ पीठ मिळिवून धिरडे उचटाला येत का प्हावुम्हणे. अंबट वास (घाण) येऊया. खाणे का, नोक्को का म्हणाच तुमच॑ इष्ट.

सोवळे प्हाणाराच घरांत सोवळेच काठी अवश्य असेल. पल्लवपुरमांत दोन सोवळेच काठी असेल. एक अपार सोवळेच काठी ; आजीम्मा, अम्मा उपयोग कराच, देवघरच॑ कोनांत ठिवलसतील. ओवळेंत असणार लेंकर-बाळ कोणीन ते काठी शिवताने. अण्खीएक काठी तेवढ॑ सोवळेयीन नहो ओवळेयीन नहो. बापा, बहीण॑, आजीम्मा अम्मा सोवळे नाहीतेम्हा उपयोग कराच.

हे काठी कस करतात ? बागांत वेळूच भरून झाड गुंप गुंप असेल. त्यांत एक वेळू चार पांच हात लांब, उदंड दांडग॑ नाहीते, पत्तळयीन नाहीते, मध्ये डोंबूर नाहीते हिरव॑ वेळू - उदंड कोवळ॑ नाहीते, निब्रयीन नाहीते - काटून घराला आणिवतील. आजिम्मा बरोर आहे म्हणून सांगिट्लांपिरी आंगणांत गलत घालून जाळ घालून, ते वेळूला अस॑ तस॑ पर्तिवून सेकिवतील. वेळूच हिरव॑ रंग जाऊन तंबड॑सर काळ॑ होजोरी सेकिवतील. त्यज नंतर त्यज वोर पाणी ओतून ठिवूनटाकतील. दुसर॑ दिवस पाष्टे आजीम्मा आंग धुवाला जायाच पुढे ते काठीला आंघोळी करून घालतील. आंग धुवूनटाकून आलांपिरीयीन त्यज वोर पाणी घालतील, सोवळे नहोका. अस॑ चार पांच दिवस करून ते काठी आंत काढींगतील॑. अत्ता ते सोवळेच काठी. शंभर वर्ष ते काठी तसेच असेल. 

ऊंशी खाले ठिवींगाला म्हणून एक कट्टा असेल. एक पाट म्हणींगाकां. तेयीन तेवढेच. सोवळे, वेगळ॑ कोणीन शिवताने. ते कस करतील ? घराच मागल॑ पटीस भरून कट्टा ठिवलसतील. सुताराला बलावून बरोरल॑ कट्टा एक काढ म्हणतील. सुतार घरा पुढे असाच मांडवा खाले बसूनेच काम करांव॑. कट्टा नीट तासून खाले दोन पांये ठिवून, चार मेख (मेखल) बडिवून आंगणांत ठिवूनटाकेल. त्यलायीन दोन तीन दिवस आंघोळी करून घालून उपयोगाला काढींगतील. ते एक काळ. खेडे गांव, चाल्ल॑. अत्ता ? चालेलका !  

ते अस्कीन असूनदे, अत्ता कसाला हे लिव्हांव॑, कोण वाचतील ? हजामाला काम काहीं मिळ्ळ नाही म्हणजे घरांतल॑ मांदराला धरून क्षवर करेल म्हणे. आराराला पंध्रा दिवस काम नाही. देऊळ गोपुर जायाला नाही, कोणालतरीन कापुम्हणेका म्हणून्नेच असताना, सोवळेच काठी तडकल॑. तेवढेच.             

सौळाच काटी (V.2)
(in DM script as spoken in his house by RR) 

नंकर रुब्बल्ते पीट उरुन्गेलोत, त्याजबरोर कोर्ड पीट मिळिवुन् दिरुड उच्टाल एतका पावुम्ण।  अम्बट वास (गाणे?) एवुया, काणका नोक्कोका मणाच तुम्च इष्ट।

सौळ पाणाराच घरांत सौळाच काटी अवश्य असल। पल्लवपुरमांत दोने सौळाच काटी असल। एक अपार सौळाच काटी, आजिम्मा, अम्मा उपयोग कराच, देवघर्च कोनांत टिव्लास्तील। ओव्ळांत अस्नार, लेंक्र बाळ कोणिन् ते काटी सिव्ताने। अणिकि एक काटी, तेव्ड सौळ नहो, ओव्ळयीं नहो, बापा, बहिणे, आजिम्मा अम्मा सौळ नाहितेम्मा उपयोग कराच।

हे काटी कस कर्तात? भागांत वेळूच बरून् जाडी गुम्प गुम्प असल। त्यान्त एक वेळू चारे पांच हाथ लाम्ब, उदण्ड दान्डक नाहीत, पंत्तळयीं नाहीत, मद्दे डोबुर नाहीत हिरुव वेळु - उदण्ड कौळ नाहीत, निब्बरयीं नाहीत - काटुन् घराल अणिव्तील। आजिम्मा बरोर अहे मणुन् सांगिट्लांपिरि आंगणांत गलत गालुन् जाळ गालुन ते वेळूल अस तस पर्तिवुं सेकिव्तील। वेळूच हिरुव रंग जावुन् तम्ब्ड सर काळ होजोरि सेकिव्तील। त्याज नन्तर त्याज वोर पाणी ओतुन् टिवुंटक्तील। दुस्र दिवस पाष्टे आजिम्मा आंग दुवाल जायाच पुड ते काटीला अंगोळी करुं गाल्तील। आंग दुवुंटकूं अलाम्पिरियीन् त्याज वोर पाणी गाल्तील, सौळ नहोका। अस चार् पांच दिवस करून् ते काटी आंत काडिंग्तील।  अत्त ते सौळाच काटी। संबर् वर्ष ते काटी तसच असल।  

उसा कल्ले टिविंगाल मणून एक कट्टा असल, एक  पाट मणिंगाकान्। तेयिं तेव्डच, सौळ, वेगळ कोणिन् सिव्ताने। ते कस कर्तील? घराच माग्ल पटीस बरून् कट्टा टिव्लास्तील। सुताराला बलावुन् बरोर्ल कट्टा एक काढ़े मण्तील। सुतार घरा पुड असाच माण्डवा कल्ले बसुनच काम करांव। कट्टा नीट तासुन् कल्ले दोने पाये टिवुन चारे मेखल बडिवुन् आंगणांत टिवुन्टाकिल। त्यालायिन् दोने तीन दिवस आंगोळी करुंगालुन् उपयोगाल काडिंग्तील।ते एक काल, केड गांव, चाल्ल।  अत्ता?  चालल्का!

ते अस्कीन् असुन्दे, अत्त कसाल हे लिवांव, कोण वाच्तील? हजामाला काम काईं मिळ्ळ नाहि म्हण्जे घरांत्ल मान्दराल दरून् क्षवर करल मण। आराराल पन्द्रा दिवस काम नाहि, देवुळ गोपुर जायाल नाहि, कोणाल्तिरीन् कापुम्णका मणूनच अस्ताना, सौळाच काटी तडक्ल, तेव्डच।  
 

bottom of page