Holiday in Bali
बाली विनोदयात्रा
Dakshini Marathi Khajana
दक्षिणी मराठी खजाना
The Parable of the Prodigal Son
Study of a 1922 voice recording of DM





Re-written in present day's DM
एक मनुषाला दोघदन॑ लोंक होते. त्यांत॑ धक्टा
लोंक म्हणणार॑ अपल॑ बापाला पाव्हून, "बपा मला
आस्तांत॑ मिळांवत॑ (मिळामत॑) वांटा अर्ध भाग करून द्यांव॑ (देम॑)
म्हणून सांगिटला. त्यला (तला) बापा तसच अर्ध भाग
करून देले. ते घेऊन थोड दिवस मागून एक दूर
देशाला जाऊन, आस्ती सर्वत्र खर्च करून सोडला (करसुडला/ करसोडला).
तम्हा तो उदंड/फार गरीब होऊनगेला. थोड दिवस
मागून ते देशांत॑ एक कुणबीकडे जाऊन पोंचला.
तो कुणबी तला (त्यला) अपला शेतांमध्ये डुक्र चारिवाला
सोडला. तम्हा, ते डुक्र खायाच कोंडातरीन खऊन पोट
भरून घ्याच॑ म्हणून चिंतून होता. तम्हा ते देशांत॑
भरून/फार/उदंड दुष्काळ येऊनगेल॑. तम्हा तला(त्यला) ते कोंडाहीं मिळाल॑
नाही. तम्हा "अम्ही असेच भूकान(भूकांत॑) मरतोंकी, अमच॑
बापाकडे केवढ॑की कामवाले आहेत॑. त्यांत॑ अम्हीपणीं (मी पणीं) एक
कामवाला सारख॑ राहून जीवन कराच॑", म्हणून चिंतून
अपल॑ बापाकडे येत होता. तम्हा बाप म्हणणार॑
अपल॑ लोंक येयाच पाव्हून समोर पळत येऊन तज॑ (त्याच॑)
गळा भेटून मुक्का(उम्मा) देला. तम्हा लोंक
म्हणणार॑ बापाला पाव्हून "बापा मीकी तुमच॑कडेहीं
भगवंताकडेहीं केवढ॑की पाप करलोंहें. ते पाह्यनास्क॑
मी तुमच॑ लोंक म्हणून सांगाला होईना म्हणून
सांगिटला. ते ऐकून बाप म्हणणार अपल॑ एक
कामवालाला बलावून मझ॑ लोंक दिसनाविणी गेला, दिसून
आला, मरूनगेला, वांचून आला. अत्ता ह्याला (हेला) घेऊन
जाऊन स्नान करिवून चोक्कोट (चोखोट) कापड नेसिवून हाताला
अंगोठी घालून, पांयाला जोडा लावून, एक गायीच॑
वांसरूला मारून जेवण॑ करून, गाण॑ वाजणे करून
संतोष पडांव॑ म्हणून सांगिटला. तला (त्याला) कामवाले
तसेच करून संतोष पडलात॑. तम्हा (तेम्हा) थोरळा लोंक
म्हणणार बाह्येर शेताला जावून घराला येत होता.
तम्हा अपल॑ घरांत॑ गाणे वाजणे होयाच ऐकून एक
कामवालाला बलावून विचारण केला. तम्हा ते
कामवाले सांगिटलेकी, तुझ॑ भाऊ दिसनाविणी गेला, दिसून
आला, मरूनगेला वांचून आला म्हणून तुझ॑ बापान तला (त्याला)
स्नान करून चोक्कोट (चोखोट) कापड नेसिवून हाताला अंगोठी घालून
पांयाला जोडा लावून एक गायीच वांसरूला मारून जेवण॑
करून गाणे वाजणे करून संतोष पडत आहे म्हणून
सांगिटला. ते ऐकून थोरळा लोंक म्हणणार घराच आंत
जाणे विना भाह्येर होता. तम्हा बापान आंत ये म्हणून
बलावला. तम्हा तो लोंक म्हणणार बापाला पाव्हून
कोठकी पळून गेल॑ होत्याला, तला (त्याला) असल॑ गाणे वाजणे
करून जेवण॑ करून चोक्कोट (चोखोट) कापड नेसिवून संतोष
पडतोसकी, मी कितीकी दिवसान तुमचकडेच आहेंकी मला
एक दिवस तरीन अस॑ सर्व करून संतोष पडला नाहीच
म्हणून सांगिटला. तम्हा बापान लोंकाला पाव्हून
सांगिटलाकी, तूकी केम्हाहीं मझ॑कडेच आहेस॑. राह्याच
मझ॑ आस्ती सर्व तुझेच॑, तो तरीन दिसनाविणी गेला
दिसून आला, मरूनगेला वांचून आला. तला पाव्हून
अम्ही संतोष पडांव॑ (पडाम॑) म्हणून सांगिटला.
Observations and Comments
The voice clip and the written matter differs. The reader seems to have exercised his fancy while reading. Also the voice clip is incomplete.
One of the criticisms of the original voice recordings was that language teachers or Govt servants were used in the Linguistic Survey of India Project for the reading, instead of laymen which would have given better authenticity regarding how the language was being used by the general public.
In the sample under reference, the story seems to have been written by non-Hindu persons, most likely Christian priests or religious missionaries. as the original parable is of Christian religious origin. It is insensitive to the Hinduism's strong religious taboo towards eating of beef.
The Dakshini Marathi sample used in this exercise appears to be of a variety not used by Brahmans, but by Kshatriyas (Marathas) or other castes. The following words illustrate this point.
-
For "younger" धकला is used whereas Brahmans generally use धक्टा/धकटा
-
For "seeing" देकून is used instead of पाव्हून
-
For "in the inheritance" असता दी is used instead of आस्तांत॑
-
For "some days" थोडरोजा is used instead of थोड दिवस
-
For "after" मगूठ is used instead of मागून or नंतर॑
-
For "very much" लैबि is used instead of भरून or फार
-
For "cultivator" कुळुबी is used instead of कुणबी
-
For "atleast the husk" कोंडातरबी is used instead of कोंडा तरीन
-
For "famine" दुक्कल is used instead of दुष्काळ
-
For "even the husk" कोंडाबी is used instead of कोंडा पणीन
-
For "I too" हमीबी is used instead of अम्ही पणीन
-
For "to you" तुमच्याकडबी is used instead of तुमच॑कडेहीं
-
For "to God" भगवंता कडबी is used instead of भगवंताकडेहीं
-
For "ignoring that" त्याज पायान is used instead of ते पाह्यनास्क॑
-
For "rejoice" संतोश पडांव॑ is used instead of संतोष भोगांव॑. (पडांव॑/पडाम॑ appears to be of Tamil origin)
-
For "rejoiced" संतोश पडल्यात is used instead of संतोष भोगले.
-
For "in the house" घरांदि is used instead of घरांत॑
-
For "even a day" येक रोजबी is used instead of एक दिवस पणीन
-
For "always" केंम्हाबी is used instead of केम्हाहीन
-
For "he" त्यान is used instead of तो