Acknowledgment:-
Mr. R.R. Chandran, ex-Vice-President of the South Indian Maharashtrian Association, Hyderabad (SIMA) has been rendering great help to me in the preparation of the dictionary. Besides contributing a large number of words and sentences he has been of great help to me in fine tuning the contents of the dictionary. No amount of gratitude will suffice for the help I have received from him.
Abbreviations - संक्षिप्त प्रयोग
adj adjective विशेषण
adv adverb क्रियाविशेषण
collo colloquial
conj conjunction उभयान्वयी अव्यय
corrpt corruption अपभ्रष्ट
decl declension
DM Dakshini Marathi /Tanjore Marathi दक्षिणी मराठी /तंजाऊर मराठी
eg for example उदाहरण
fig figure of speech शब्दालंकार
gram grammatical form व्याकरण रूप
hin Hindustani हिंदुस्थानी
imp imperative आज्ञार्थ
ind indeclinable अविकारी
interj interjection केवलप्रयोगी अव्यय
met metaphor अर्थभेद अलंकार
n noun नाम
p participle धातु विशेषण
phr phrase शब्दसमूह
pret preterite क्रीयापदाच भूत काळ.
pref prefix उपसर्ग
prep preposition शब्दयोगी अव्यय
pron pronoun सर्वनाम
prov proverb
say saying म्हण
slng slang असभ्य भाषा
sm Standard Marath i/Pune Marathi पुणे मराठी
suff suffix प्रत्यय
u usage बोलीप्रयोग
uis used in sentence वाक्यांत प्रयोग
v verb क्रिया
vi intransitive verb अकर्मक क्रियापद
vt transitive verb सकर्मक क्रियापद
अ
अ the first vowel and the first letter in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्ष्ररमालाच पहिल स्वर.
अ pref used as a prefix to indicate negative meaning (eg. असत्य, असंभव etc).
अकटविकट adj monstrously huge. hideously large. भयंकर आकाराच॑. भें वाटाच एवढ॑ थोर. मोठ घोर
आकाराच ; अकटोविकट in sm. uis यक्षराजा सुकेतूच लेंक ताडका एक सुंदर पोरी होती, पण अगस्त्य ऋषीच शापामळे तिन॑ अकटविकट रूपाच राक्षसी झाली.
अकटविकट सामर्थ्य adj oversmart. extra cunning. विपरीत वक्रबुद्धीच. uis पाकिस्थानाच नेतालोके भारताच विरुद्ध अकटविकट सामर्थ्य दाखिवून अत्ता त्यंच देश अधोगेतांत जात आहे.
अकर्मक क्रियापद n intransitive verb (gram). वाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच आवश्य नाहीते क्रियापद (व्याकरण). uis निसरणे, हे एक अकर्मक क्रीयापद आहे.
अकस्मात adv unexpectedly. suddenly. असलास्क असून. दिडीरशी (Tamil). uis साळेंत मझ बरोर वाचलते मित्राला पाव्हून उदंड दिवस झाल होत॑. काल दुकानबीदीला गेलास्ताना मी तला अकस्मात पाह्यलों.
अकारण adv without reason. कारण नाहीस्क. विना कारण. uis तू कायतरीन खोडी केलासील. अकारण तुला कोणीन हाक्का मारनात /शिवा देनात.
अकाल n untimely. अवेळ. uis मृकंडु ऋषी अणी मरुदमतीच लोंक होऊन उजलते मार्कंडेय सोळा वर्षांत अकाल मरण प्राप्त होईल म्हणून होत॑ तरीन, यमधर्माकडून ते बालऋषीला भगवान शिव वांचिवले.
अकालमरण n untimely death. ल्हान आयुषांत होयाच मरण. अकालमृत्यू. uis तिला तीस वर्षपणीं झाल नव्हते. कॅनसर येऊन अकालमरण झालते ऐकून मला संकट वाटल॑.
अकालमृत्यू n untimely death. ल्हान आयुषांत मरणे. अकाल मरण. uis गणित शास्त्रांत फार सामर्थ्य दाखिवलते स्रीनिवास रामानुजन बत्तीस वर्षांत अकालमृत्यू प्राप्त करले.
अक्कतीज n the Hindu festival falling next day to भाऊबीज (after Dipavali) when brothers honour sisters. दीपावली सण झाल नंतर अणी भाऊबीजाच दुसर॑ दिवसी भाऊंडे बहिणींस आदर कराच सण. uis मझ बहीण / बहिणी विदेशांत आहे-ते-करतां अक्कतीज सणाला वर्षा-वर्षी एक हदार / हज़ार रुपे तिज बॅन्क खातांत (अक्कौन्टांत) मी घालणे आहे. Note. अक्का (sister) + तीज (third day of the lunar fortnight).
अक्करे n eagerness. अति आशाच विचार. uis बाजू घरच लोकांमध्ये कायतरीं भांडा-भांडी झालतर अम्ही त्यंच विषयांत तोंड घालून अक्करे दाखिवणे चोखट / चोखोट न्हो म्हणतील. Note. from Tamil.
अक्का n elder sister. वडील बहीण / बहिणी ; ताई / आक्का in sm. uis शेखराला धक्टि बहीण कोणीन नाही. एक अक्का मात्र आहे.
अक्कि n a type of pox. एक विधाच देवी-रोग. uis अगाऊच काळांत लेंकरांस अक्कि आलतर कुंभाराकडे बलाईंगून जावून मंत्र करींगून हातांत यंत्र बांधींगून येतील.
अक्रम n unlawful act. नियमाच विरुद्ध कराच काम. uis चोर्टे लोके अक्रमकार्य काहीं करनास्क असाला अम्च गामाच (गांवांच) पोलीस उदंड पाह्यींगतात.
अक्रम n disorder. क्रमाच विरुद्ध. uis मध्य-मध्य बंगळूराच पोलीस अक्रम पसराच गुंडा लोकांस धरून किलुपांत / कैदांत / कारागृहांत घालणे आहे.
अक्रा n eleven. दहाच नंतरल संख्या ; अकरा in sm. uis क्रिकेट, फुटबाल, हॉकी असलते खेलांत एक एक पक्षांतीन अक्रा अक्रा दन अस्तील.
अखतीज n the Hindu festival of Akshay-thritheeya falling on the third lunar day of the first half of Vaishakha. अक्षयतृतीया. अक्षतृतीया. uis (1) वैशख महिनेच शुक्लपक्षाच तृतीया दिवसी अक्कतीजाच सण येत॑. (2) अक्कतीजाच दिवसी चोखट / चोखोट काय करल तरीन वर्ष पूरा अण्कीन ते वाढत जाईल म्हणून भरून लोके ते दिवसी सोनेच आभरण घेतील. Note. from अक्षय, perpetual (prosperity) + तीज, third day of the lunar fortnight.
अखंड adj undivided. wholly in tact. सग्ळ॑ होऊन असाच. संपूर्णविणी असाच uis अखंड होऊन असलते "यु. एस. एस. आर" 1996 नंतर पंध्रा वेगळ॑-वेगळ॑ राज्य झाल॑.
अखंड-दिवा n an oil lamp kept burning perpetually in front of gods' idols. देवाच विग्रहाच समोर लावून ठिवाच निरंतर दिवा. नंदादीप. uis अखंड दिवा लावाला तीळाच तेल श्रेष्ट म्हणून शास्त्र सांगते.
अग ind a manner of addressing a girl or a woman. पोरींना / बायकांना बलावाच एक रीत. uis मझ बाईलीला मी "अग" म्हणून बलावाच थोडकपणीन इष्ट नाही. "नाव सांगून बलावांत" अस सांगते.
अगत्य adv without fail. कंडिप (Tamil). uis मझ लेंकीच वराडाला तुम्ही येईनास्क असताने अस्ताने. अगत्य येऊनच सराम / सरांव.
अगत्य n essential / necessary condition or requirement. imperative. अवश्य. uis तुम्च नव घराला येयाला वाट मला कळेल. वाट दाखिवाला म्हणून एक मनुषाला तुम्च कडून पाठिवून देवूनच सराम अस अगत्य काहीं नाही.
अगत्य n required attention. पह्जते एवढ॑ लक्ष्य / श्रद्धा. uis उद्या शेवटीच परीक्षा आहे, तरीन, थोडपणीं अगत्य नाहीस्क तो टी.वी. पाह्त बसलाहे.
अगरबत्ती n incense stick. ऊदुबत्ती. uis अगरबत्तीच वास लागलतर श्वास सोडणे कष्ट होईल म्हणून कित्येक लोकांस ते बरोर पडना.
अगाऊ adv in advance. beforehand. पुढेच ; अघाऊ in sm. uis बाह्येर गामाला / गांवाला कोठतरीन जायाच असलतर वापस येयाच टिकट अगाऊ घेऊन ठींगणे चोखट /चोखोट.
अगाऊचकाळ n earlier times. गेलते काळ. uis पंतोजी लोकांना अगाऊच काळांत मिळास्क अत्ता मर्यादा मिळणे अप्रूप झालाहे.
अगाध adj profound. deep. गाढ. तीव्र. uis तत्वज्ञानांत अगाध पांडित्य असाच व्यक्तींच भाषण ऐकलतर अम्च मनांत त्यंचवर अपाप मर्यादा येईल.
अग्गीन pron everything. all. अस्कीन. अस्गीन. अग्गीं. सग्ळीन. पूराहीं. uis हे खोली अत्ताच खालीकरून देम॑. आंत असाच सामान अग्गीन /अस्कीन काढून बाहेर ठिवाम म्हणून खोलीच मालक मला सांगिट्ले. Note. (1) अख्खा in sm means "full"/"entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि /अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अग्निकाष्ट n cinder. पेटून उरलते कोळसा. पेटून उरलते लांकड. uis होम झालानंतर भोईं पुसताना आचारेच बोट अग्निकाष्ट लागून लासल॑.
अग्निकुंड n a fire-pit for performing sacred rites. होम कराच अग्नीच कुंड. होमकुंड. uis घरांत होम करताना भोईं (भोए) हाळ होयनास्क असाला वाळू घालून तजवर अग्निकुंड करणेच चोखट / चोखोट.
अग्निज्वाला n flame. विस्तूच ज्वाला. विस्तूच पेट. uis यंदा / हे वर्षी अम्च गांवाच जवळच डोंगूरांत मोठ जाळ पेटून तिकडल राण पूरा जळून नाश झाल॑. दोन मैल दूरांत्सून अम्हाला अग्निज्वाला दिसत होत॑.
अग्निनक्षत्र n a particular day in summer when the temperatures are very high. सूर्याच ऊन भयंकर असाच उन्हाळाच दिवस. uis हे वर्ष अग्निनक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत जाऊन सांपडींगून तिकडल॑ भयंकर ऊबांत तरपडून गेलों.
अग्निपरीक्षा n extreme ordeal to prove moral veracity and character. पवित्रता दाखिवाला कराच उग्रपरीक्षा. uis पैसा घेवून क्रिकेट मॅचाच परिणाम बदलिवाला प्रयत्न करलते अपवादांतून चुकाला कित्येक लोकांस एक मोठ अग्निपरीक्षा करामस्क झाल॑.
अग्निपर्वत n volcano. ज्वालामुखी. uis भारताच एकच-एक अग्निपर्वत अंदमान-निकोबार द्वीपांत आहे.
अग्निप्रवेश n walking over burning embers of coal or wood fire under a vow. नवस करून कोळसाच विस्तू नाहीतर लांकडाच विस्तूच व॑र चालून जाणे. uis तमिलनाडांतल॑ कित्येक देऊळांत अग्निप्रवेशाच नवस उदंड प्रसिद्ध आहे.
अग्निशमन n putting out the fire. विस्तु विजिवणे. uis फार उंच असाच बांधणींला विस्तू पेटलतर ते शमन कराला पह्जते उपकरणीं अग्निशमनाच बंडीनीं अम्च गांवांत (गामांत) आहेका, हे अम्हाला संदेहच.
अग्निहोत्र n name of a Hindu religious ritual dating to the Rigvedic times. ऋग्वेद कालांतून आचरण कराच एक हिंदू यज्ञाच नाव. uis ऋग्वेदाच अग्निहोत्र यज्ञालीन, अग्नीला फार महत्व द्याच फार्सी / पार्सी धर्म, म्हणजे, ज़रथुष्ट्री धर्मालीन संबंध आहे म्हणून धर्म पंडितांच एक अभिप्राय आहे. Note. in this homa cow's milk or ghee is offered into fire every day at sunrise and sunset accompanied by the agnihotra slokas.
अग्निहोत्री n a priest who performs agnihothra. अग्निहोत्र यज्ञ कराच पुरोहित. uis अग्निहोत्र कराच कित्येक ब्राह्मणकुलांच लोक त्यंच अडनाव अग्निहोत्री म्हणून ठींगतात.
अग्नी n fire. विस्तू. uis अग्नी कस करणे म्हणून आदि मनुषाला शिकाला झालते, मानव संस्काराच एक थोर विषय आहे म्हणून शास्त्रज्ञ लोक सांगतात.
अग्नी n the god of fire. अग्निदेव. uis ऋगवेदांत विष्णू, शिव ह्यांच पक्षा अग्निदेवाला स्तुती कराच श्लोकांच संख्या जास्ती आहे.
अग्र adj leading or top end or edge. apex. शेंडा. कोने भाग. शेवटीच भाग. अग्रभाग. uis महाराष्ट्रांत गोकुलाष्टमी दिवस ओठाकिवून / होठाकिवून ठिवलते एक मोठ काठीच अग्र भागांत दहींच मडके बांधून तला फुटिवाच खेळ उदंड आवेशांत खेळतील.
अग्र adj foremost. best. स्रेष्ट. uis पंचपांडवांत अर्जुनाला "अग्र" म्हणून सांगतात.
अग्रगण्य adj outstanding. counted amongst the best. principal. मुख्य. प्रधान. uis भूलोकांत एवढपर्यंतीन जन्म झालते शास्त्रज्ञांत अल्बर्ट ऐनस्टीन सगळयांचीन पक्षा अग्रगण्य म्हणून सांगूया.
अग्रभाग adj leading or top end or edge. पुढेच भाग. वर्चभाग. uis सणाच दिवसी पान मांडून जेवण वाढताना पानाच अग्रभागांत मीठ वाढतील.
अग्रहार n an enclave or a street in a village occupied by Brahmins. ब्राह्मणलोक राहाच / राह्याच वाडा. ब्राह्मणलोक राहाच बीद. uis बंगळूराच जवळ तमिलनाडाच धर्मपुरी जिल्लांत श्री राघवेंद्रस्वामीच ब्रिंदावन पाप्परपट्टी अग्रहार म्हणाच ठिकाणी आहे.
अघोर adj dreadful. घोर. भयंकर. भें वाटाच॑. uis प्रेत पिशाचाच सिनिमा "ड्राकुळा" मला अघोर वाटल॑.
अच्च n mould. अच्च. uis वराडांत नवरीला मूल-पाह्याच वेळी कट्टाच (लांकडाच) अच्चांत केलते विध-विधाच साखरीच-बावोली ठिवणे आहे. Note. from Tamil.
अच्युत n Lord Krishna. श्रिक्रिष्णा. uis अच्युत म्हणाच गोष्टाच अर्थ आहे, दृढ स्थितींत असणार म्हणजे, कद्दीन नाश न होणार.
अजय adj unconquerable. one who cannot be defeated. हरिवाला होयनाते. uis मल्लयुद्धांत भीमसेन अजय होते.
अजित adj unconquered. हरनाते. uis तज माय-बाप तला अजित म्हणून नाव बरोर ठिवले कां म्हणजे, हातांत कोण्त काम काढलतरीन, कसलते कष्ट आलतरीन, ते अग्गीन समाळून /सांभाळून जिंताच सामर्थ्य तला आहे.
अजीर्ण n indigestion. जीर्ण होयनास्क असणे. दहन होयनास्क असणे. uis कित्येकदनांस कच्चा फणसाच भाजी खालतर अजीर्ण होईल.
अजून adv yet. still. तरीन. uis चार घंटेच पुढे येतों म्हणून तो सांगीट्ल्होता. अत्ता साडे चार होत आहे. अजूनीं तो आला नाही. उगेच थांबून प्रयोजन नाही, जावुम्हणे.
अटकणे vi to get snagged. सांपडिंगणे. uis वाळिवाच दोरींतून वाळलते कापड काढताना कांबाच कोनेंत अटकून मझ एक अंगी फाटल॑.
अटकळणे vi to stumble. to trip over. पांय अडकून लंबडून (लवंडून) पडणे ; अडकळणे / अडखळणे / अडखुळणे in sm. uis मझ बहिणी मैसूरांत बांधाच नव घर पाह्याला अम्ही गेल वार गेल्होतों. घराच आंत वेघताना उंबरांत बांधून ठिवलते अडव काठी पाह्यनास्क॑ मी अटकळून पडलों. Note. the different spellings in sm are as per J.T. Moleswoth's A Dictionary of Marathi English (1857).
अटणे vi to boil to a thick consistancy. अडणे. ताऊन उणे होणे. uis दूधपेढा करताना दूधाच अटणे बरोर गवनांत ठीवींगाम॑, कां म्हणजे, जास्ती अटलतर दूधपेढा करपून जाईल.
अटोपणे vi to contain. पूर्णभागविणी असणे. uis हिंदू धर्माच सगळ॑ मूलशास्त्र ग्रंथहीं ॐ म्हणाच ओंकार नादांत अटोपून आहे म्हणून विश्वास.
अटोपणे vt to wind up. संपिवणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणे in sm. uis मुंजीच छत्रांतून तेवढीन अटोपींगून येताना दुपारा चार घंटे झाल॑.
अटोपणे vt to control. नियंत्रण करणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणे in sm. uis वराडाच वेच दहा लाखांत अटोपुया म्हणून मला वाटते.
अटोपणे vt to put up with. सोसणे. uis मी तीर्थ-प्रसाद घ्याला मठाला घेल्होतों. उदंड /उजंड वेळ झाल॑. मला भूक अटोपींगाला झाल नाही.
अटोपणे vt to restrain. नियंत्रणांत ठिवणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणें in sm. uis तो वेडाला उदंड आवेश येऊन कोणाल तरीन माराचपुढे कोण तरीन तला अटोपिवांत॑.
अट्टहास n boisterous and uncontrolled behaviour. उदंड वरडत गलाटा करणे. uis वेगळ॑ लेंकरांच अट्टहास पाह्ताना अम्च लोंक फारच साधू म्हणून सांगूया.
अट्टहास n boisterous and uncontrolled loud laughter. वेडपणाच हांस. uis जुने काळाच "मायाबज़ार" सिनिमांत घटोत्कच सांगाच एक गाणे अत्तापणीं अठींगटलतर मनाला कुशी / खुशी वाटते. ते गाणेंत॑ घटोत्कच कराच अट्टहास ऐकाला बेष / बेश अस्त.
अट्टा n card board. जाड कागद. रट्ट. uis नाजूक साधन अट्टाच डब्बांत जोडून ठिवताना मध्ये मध्ये फेविकॉल ठिवून जोडलतर चोखट / चोखोट.
अठवण n remembrance. recollection. सयेंत याच॑ विषय. uis गेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून अठवण असलतर तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
अठवणे vi to come to mind. to remember. to recollect. सयेंत येणे ; आठवणे in sm. uis गेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून तुझ मनांत अठवणे आलतर तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
अठींगणे vt to recollect. to ruminate. योचना करणे. सुचींगणे. सये करींगणे. uis (1) अमचेच चूकामळे हातांतून पैसे गेलते विषय अठींगून प्रयोजन नाही. (2) दोन दिवसा्च पुढे तिज नव॑ बावोली हरपला पसून अत्ता पर्यंतीन / पतोरी / पावेतोरी ते ल्हान पोरी तेच अठींगून-अठींगून रडत आहे.
अठींगणे vt to suggest to oneself. अपाप मनांत सुचींगणे. uis अम्च लोंक अमेरिकांत वाचत आहे. अठींगलास्क समेच बांगळूराला पळून येयाला होईना.
अठ्रा n eighteen. सत्राच नंतरल संख्या ; अठरा in sm. uis अठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च देशांत मतदान कराला अर्हता आहे.
अडकत्या n a scissors like instrument to slice betel nut. सुपारी कापाच कात्रास्कल एक उपकरण. अडकिता.अडिकित्या. uis जुने काळांत एक एक घरांतीन अडकत्या होत॑तरीन अत्ता ते पाह्णे फार अप्रूप झालाहे.
अडकणे vi to snag. सांपडींगणे. uis पतंग उडिवत अस्ताना दोरी एक नारळीच झाडांत अडकल॑ अणी ते सुटिवाला प्रयत्न करताना दोरा तुटल॑.
अडकरणे vt to block. to obstruct. अडव करणे. मध्य येणे. अडव येणे. uis कापड वाळिवाच कांब नंखर व॑र बांधलनाहीतर॑ लेंकरे पळा-पळी करताना तेनी कांबांत अडकरून खाले पडतील.
अडक॑ n a type of cooking vessel. संपाकाच एक विधाच भांडी. uis अडक॑ भरून सांभार करून पणीन पुरे-पुरनास्क॑ होईल म्हणून अमच॑ आजी अण्खी एक अडकेंत॑ कढी करून ठिवले. Note. with its diameter smaller than its height.
अडकिता n betelnut slicer. अडकत्या. अडिकित्या. सुपारी कापाच कात्रास्कल॑ एक उपकरण. uis मझ॑ लेंक तिज आजीच अडकिता कोठकी हरपूनटाकून काहीनच कळनात्यास्क॑ उगे बसूनगेली.
अडकिवणे vt to hang someting (in a hook etc). लोंबून घालणे. अडिकिवणे. लटकिवणे ; अडकवणे / अडकविणे / अडिकिवणे in sm means 'to hinder', 'to stop'. uis साळेंतून वापस घराला अलांपिरी भिंतींत॑ असाच खिळांत॑ अडकिवलते पुस्तकाच पिशवी पुन्हा साळेला जाया पर्यंतीं उघडाच दंडक तला नाही.
अडकिवणे vt to fasten cross-wise (as an hindrance). अडव बांधून ठिवणे. अडिकिवणे. uis कापड वाळिवाच कांब अडकिवून बांधनको म्हणून मी तला सांगट्लोंतरीन तसच बांधूनठिवलाहे तो.
अडचण n difficulty. constraint. उपद्रव. तंटा. कष्ट. uis पैसाच काहीं अडचण असलतर संकोच भोगनास्क मला सांगा. मी तुम्हाला सहाय करतों.
अडचण n congestion. गुंपामळे होयाच तंटा. uis पटणाच जनसंख्या भयंकर होऊन वाढलाहे. कित्येक बीदी वाटी चालाल पणीन होयनाते एवढे अडचण झालाहे.
अडणे vi to boil to a thick consistancy. अटणे. तावून उणे होणे. uis दूधपेढा करताना दूधाच अडणे बरोर गवनांत ठीवींगाम॑, कां म्हणजे, जास्ती अटलतर॑ दूधपेढा करपून जाईल.
अडनाव n surname. उपनाव. कुलनाव ; आडनाव in sm. uis मराठी लोकांमध्ये अडनाव प्रति व्यक्तीनीं ठींगतात॑. पण, अनेक तंजाऊर मराठी कुटुंबांत॑ उदंड वर्षापसून त्यंच अडनाव विसरलामुळे / सुटलतामुळे अडनावाच बद्दल / भरती नुस्त "राव" म्हणून ठिवींगतात॑.
अडनीद n half sleep. half awake. drowsiness. अर्धझोंप॑. जागेझोंप. uis दुपारच वेळ मी अडनीदांत असताना मला उठीवून सिनिमाला येतांतका म्हणून विचारलतर मी काय सांगू ?
अडभिंत n a parapet. उणे उंचाच भिंत ; आडभिंत in sm. uis तिरुपती देऊळांत देवाला दर्षन करालाम्हणून ओठाकाच / होठाकाच लोकांच पंक्ती नियंत्रण कराकरतां अडभिंत बांधून तज वर कांबाच जाळीच व्यवस्था केलाहेत.
अडमान n pledge. mortgage. pawn. वस्तूच जाम्य देऊन रीण काढणे. uis अडमान ठिवलते घर सुटिवाला झाल नाही म्हणून घर लिव्हून द्याच अवस्था झाल त्यांस. Note. from Tamil.
अडराण n barren wilderness. विजन स्थळ. काहीं नाहीते ठिकाण. ओस बढिवलते ठिकाण ; आडरान in sm. uis अम्ही लेंकरे असताना एकदपा अनंतशयतांतून मद्रासाला जातम्हा कोठकी अडराणांत॑ बंडीच यंत्र नाश होऊन रात्री पूरा तिकडेच राह्मते पडल॑.
अडव॑ adv across. cross. वलांडून असणे. एक बाजूकडून अण्खी एक बाजूकडे असणे ; अडवा in sm. uis (1) उंबरांत पांय अडव॑ ठिवून बसताने म्हणून थोरळे सांगतील. (2) मध्यच अडव॑ वाटांतून गेलतर लोक्कुर जाउया.
अडव॑-तिडव॑ adj crooked. not aligned properly. वंकड-तिंकड. वक्र. uis मझ नातू तज स्नेहितांच बरोर खेळींगत असताना मी दोन दपा मागेसूं गेलों. तो समच "आजा, एक ठिकाणी बसा, उगच अडव॑-तिडव॑ येयनाका. अम्ही खेळत आहों" अस वरडला.
अडव॑-पडणे vt to interfere. अडवे येणे. मध्य पडणे ; अडवणे in sm. uis तो एक अवघड मनुष. अम्च सगळे कार्यालीं अडव॑ पडल तरच तला मनसमाधान होईल॑.
अडव॑-येणे vt to cross one's path. वाटेंत॑ समोर वलांडून येणे. uis घर सोडून बाह्येर जाताना काळ मांद्र अडव॑ आलतर चोखट / चोखोट शकुन नहो म्हणतील.
अडव॑-येणे vt to interfere. अडव॑ पडणे. मध्य पडणे ; अडवणे in sm. uis मझ भाऊ त्यंच 'प्ळोटांत॑' घर बांधाला आरंभ करतानाच कोणकी चार लोक अडव॑ येऊन काम राह्त॑ कराला सांगीटले. विचारताना, जमीन त्यंच म्हणून बडिवून सांगीटले.
अडवाट n an ill prepared narrow by-lane. उणे रुंदाच कच्चा वाट ; आडवाट in sm. uis (1) अम्च घरांतून देऊळाला एक किलोमीटर आहे. अडवाटी गेल तर॑ अर्ध किलोमीटर पणीं नाही तरीन अंधार झालांपिरी सर्पांच तंटामळे तस॑ चालणे चोखट / चोखोट न्हो. (2) ते अडवाटांत॑ सर्पांच वाल्मीक (वारूल) भरून असाकरतां अम्ही तस जाणेच नाही.
अडवेळ n odd time. सौकर्य नाहीते वेळ ; आडवेळ in sm. uis अमच बाजू घरच मनुष केम्हा पाह्यलतरीन मी दुपारा झोंपी जायाच वेळच मझकड बोलाला येतील. अडवेळांत येईनाका म्हणून कित्ति दपा सांगिटल तरीन ऐकनात.
अडिकित्या n a hand held pincer like instrument for slicing betel nut. अडकत्या. अडकिता. सुपारि कापाच उपकरण. सुपारि चूर-चूर कराच एक ल्हान उपकरण. uis पान-सुपारीच पेटींतून त्यंच अडिकित्या काढताने म्हणून मझ॑ अम्मा कित्ती सांगटलतरीन मझ॑ लोंक ऐकना म्हणतो. ते काढून कोठ तरीन लप्पून ठिवणेंत॑ तला संतोष वाटतेकी कायकी.
अडिकिवणे vt to hang someting (in a hook etc). लोंबून घालणे. अडकिवणे. लटकिवणे. uis पलंगाच चार पटीसीन भिंतींत खिळा बडिवून ठिवलतर केम्हा पह्जेतरीन डांचाच पर्दा अडिकिवाला सौकर्य असल॑.
अडिकिवणे vt to fasten cross-wise (as an hindrance). अडव॑ बांधून ठिवणे. अडकिवणे. uis रात्रीच वेळ गाईच गोठांतून वांसरू बाह्येर पळून जाईनास्क असाला एक बांबू अडिकिवणे बर॑.
अडि-घालणे vt scheming. plotting stealthily. रहस्यंत ओंगळ / वंगळ कामाच योजना तय्यार करणे. uis मझ बरोर काम करणार एकला कंपनीच वाटेंतच अमेरिकाला जायाला अडिघालत आहे म्हणून मला आजच कळ्ल॑. Note. from Tamil usage.
अडिवणे vi & vt to come in the way. to impede. अडव॑ येणे ; अडवणे in sm. uis चूक असाच काम करताना अम्च मनसाक्षी अम्हाला अवश्य अडिवत अस्त / अडिवते.
अडीच adj two and a half. दोनाच पक्षा अर्ध जास्ति. uis एक किलो मीठ घेताना दुकानदाराला मी तीन रुपे देलों. तेनी मला पन्नास पैसे परतून (वापस) देले. म्हण्जे, एक किलो मीठाच मोल अडीच रुपे म्हणून जाल॑.
अणवरणे vi taken after. inheriting qualities of forefathers. chip of the old block. पूर्वजांच स्वभाव असणे. uis ते पोर तज आजाला अणवरलाहे. तज पुस्तक, कापड, खेळाच सामान सर्वीन बरोरल॑ ठिकाणी असलनाहीतर नाकावर राग येईल.
अणि conj and. अण्खी. अण्की. अण्खीन ; आणि in sm. uis तपालांत आज मला दोन कागद अणि एक पार्सल मिळ्ल॑.
अणुशक्ती n atomic power. अणूंतूं काढाच शक्ती. uis अण्खीन पुढे जातां-जातां देशाला अणुशक्तींतून "पवर" काढनास्क वेगळ॑ वाट असना.
अणू n atom. एक पदार्थाच एकदम ल्हानापक्षा ल्हान अंश. परमाणू. uis ब्रिटीष शास्त्रज्ञ जॉन डाल्टन, हेनीच पह्यिल॑ पह्यिल॑ अणू विषीन शास्त्रलोकाला कळिवलते.
अणे n the coin Anna. आणे. uis ते काळांत चार अणेला दोन इड्ली मिळत होत, पण अत्ता तेच इड्लीला पंध्रा रुपे झालाहे.
अण्कि conj and. अणी. अण्कीं. अण्खीन. uis दुकानांतून मला चार सामान घ्याच होते. तांदूळ, तुरीचदाळ, केरसोणि अण्कि तेल.
अण्कीन conj additionally. still more. अणी. अण्कीं. अण्कि. uis (1) तुला पोट भरल॑ नाही तर अण्कीन थोड पोंगल खा. (2) अण्कीन फुंकलतर हे बलून फुटेल॑.
(3) मला पाठ दुखताना अण्कीन एक ऊंशी डोस्केच खाले ठिवून/ठींगून निजलतर हायशी अस्ते.
अण्कीन conj yet again. पुन्हा. अण्खीन. uis तुम्च कष्ट पूरा मी ऐकलों. अण्कीन मला तेच सांगूंनाका.
अण्कीन conj till now. even now. अण्खीन. अत्ता पर्यंतीन. हे पर्यंतीन. हे पतोरी. uis (1) मझ घरांतून मझ मित्र वापस (परतून) जाताना मोट्ठ॑ पौस (पाऊस) आरंभ झाल॑. ते करतां त्यांस मी मझ छत्रि देलों. अण्कीन तेनि ते मला परतून आणून देल नाहीते. (2) पांच निमिषांत॑ वापस येतों म्हणून गेलता अण्कीन आला नाही.
अण्णा n elder brother. वडील भाऊ. uis अम्ही भाऊ-भावंडेंत॑ मीच धक्टा. मला तीन अण्णा आहेत॑.
अण्णा n father. बापा. uis अम्च अण्णा ऑफीसांतून लोक्करच येतों म्हणटले, पण, एवढ॑ वेळ झालतरीन अण्खीन आल नाहीत॑.
अण्थूण n mattress. bed. निजाला उपयोग कराच एक साधन॑. अंथरूण. लेप. नाहिली. uis मला उदंड दिवसापसून मादसूळ होत॑. मझ जुने अण्थूण काढूनटाकून एक चांपाच व॑र निजाला आरंभ केलानंतर ते सूळ अपाप राहून गेल॑.
अति adv extreme. उजंड. उदंड. दंड. फार. uis पैसाच मोह अति झाल तर जीवनांत वेगळ॑ कसाच वरीन मन्न राहिना.
अतिथी n guest. घराला आलते लोके. uis अम्च घरांत अतिथीला म्हणून एक प्रत्येक खोली केम्हाईन तयार होऊन अस्त.
अतिथीसेवा n serving the guest. अतिथीला सेवा करणे. uis अतिथीसेवांत अम्च देश वेगळ॑ कोण्त देशाचीन मागे नाही.
अतिवृष्टी n deluge. मोठ पाऊस. रिचिवाच पाऊस. uis हे वर्ष डोंगूर प्रदेशांत॑ अतिवृष्टी होऊन नदीच पाणी गांवांच भोंताले असाच जमीन पूरा बुडूनगेल॑.
अतिवृष्टी fig excess of a thing (beyond normal requirements). आवश्याच पक्षा उदंड जास्ती (होणे). uis साधारण म्हणूनच मला दुसरेंला सहाय कराच बुद्ध नाहीतेमळे दुसरेपणीन मला सहाय कराला येत नाहीत. पण, कित्येकदा कोणतरीन मला सहाय कराला आरंभ करतानाच "तो एक शोंबेरी. एवढे केलते पुरे. अतिवृष्टी दाखिवाच आवश्य काहीं नाही" अस सांगतात.
अतिवृष्टी-अनावृष्टी fig either too much or too little. उदंड जास्ती नाही, उदंड उणे. uis फार लोक त्यंच जीवन बरोर चालत अस्तान देवाच पटाला नमस्कार पणीन करनात. हेनीच कष्ट काळ आलतर, नित्य देऊळ-गोपूर म्हणून हिंडतील. असलते स्वभावाला अतिवृष्टी-अनावृष्टीच स्वभाव म्हणून सांगणे आहे.
अतिशय adj wondrous. अतिशय. विस्मय. uis राजा हरिशचंद्र सत्यनिष्टाच व॑र दाखिवलते अगाध साधना अतिशय होत॑ म्हणून सांगूया.
अतिशय adj amazing. fantastic. अतिशय. uis क्रिकेटांत सचिन टेन्डूळकर मारलते रन्सीं तेनि मारलते सेंचुरीच संख्याईं पाह्यलतर त्यंच प्रदर्शन॑ एक अतिशय विषय म्हणून सांगणांत चूक काहीं नाही.
अत्तर n a type of perfume. एक चोखट / चोखोट वासाच द्रव्य. uis अत्तर म्हणून अडनावाच एकले मझ बरोर ऑफीसांत काम करत होते. विचारताना कळ्ळ॑, त्यंच पूर्वज अत्तर उत्पादन करून विकत होते अणी तजमळे त्यांस हे अडनाव आल म्हणून.
अत्तशाला adv for the time being. अत्तसाला. हे वेळेला मात्र. सध्याला. uis आवश्य नाहीस्क पैसा वेच कर नोको. अत्तशाला पन्नास रुपे खर्च करलतर पुरे.
अत्तसाला adv for the time being. अत्तशाला. हे वेळेला मात्र. सध्याला. uis तुम्ही करत असाच काम अत्तसाला पुरे. राह्ते करा. नंतर पुन्हा आरंभ करूया.
अत्ता adv now. हे वेळ॑ ; आता in sm. uis "मागच पुढेच॑ (नंतरच) विषय चर्चा करून प्रयोजन नाही. अत्ता काय करूया, हे सांगा."
अत्ता-अग्गीन adv nowadays. अत्ता-अस्गीन. अत्ता-अत्ता. अत्ता हे काळांत. अत्ता होत असाच काळांत. uis अता अग्गीन जुने काळास्क॑ न्हो. चुकून पणीन कोणाच विषीनीं काहीं बोलाल नाही.
अत्ता-अत्ता adv recently. just now. थोड दिवसाच / वेळाच पुढे. uis अम्च गांवांत अत्ता-अत्ता नव होऊन आरंभ केलते बॅन्क कृषी अण्खी ल्हान उद्योगाला रीण देतात म्हणून कळ्ळे.
अत्ता-अत्ता adv nowadays. अत्ता अग्गीन. अलीकडे थोड दिवसापसून. uis काळ एवढे मोस झालाहे म्हण्जे, अत्ता-अत्ता कोणालीन विसंबाला नाही (पातेद्यालाच नाही).
अत्ताच adv now itself. just now. अत्तास. समेच. सवेच. हे वेळांतेच. uis ते ल्हान पोरी हट्ट करून रडत बसल होती (बसल्होती). काय झाल म्हणून विचारताना "मला ते बावोली अत्ताच पह्जे" अस कुंथत कुंथत सांगट्ली.
अत्तास adv now itself. हे वेळांतच. अत्ताच. समेच. सवेच. uis बेकरी दुकानांतून घेईंगून आणलते केक अत्तास खाऊन संपीव नोको, सायंकाळी अम्च॑ घराला येणार लोकां करतां आणून ठिवलोहें ते.
अतृप्त adj unsatisfied. तृप्त झाल नाहीते. uis गांवाला नव आलते सरकारी अधिकारीच वागणे अम्हाला अवडल नाही. अम्च अतृप्त त्यांस कळिवाला जातों.
अतृप्ती n dissatisfaction. संतोष झालनाहीते. असंतोष. असमाधान. uis तज वागणे थोडकपणीन बरोर नाही म्हणून मझ अतृप्ती स्पष्ट होऊन कळिवून पणीन तो सुधारला नाही.
अत्यंत adj exceedingly. दंड. उदंड. उजंड. फार. अपार. uis एक नव अधिकारि गांवाला आलेकी म्हणून गांवाच लोक त्यंच बरोर बोलाल गेले. पण ते अधिकारीच वागणे बोलणे हे अग्गीन पाव्हून थोडक पणीन क्षमा नाहीते मनुषास्क वटल॑. तेनी एक अत्यंत रागिष्ट मनुष आहेत म्हणून सांगींगून वापस येऊनगेले.
अत्या n father's sister. बापाच बहीण. बापाच बहिणी ; आत / आते / आत्या in sm. uis मला दोन अत्यालोक आहेत. एक मझ बापापक्षा वडील, दुसरे त्यंच पक्षा धक्टे.
अत्याग्रह n excessive desire. greed. अति आग्रह. आवश्याचपक्षा जास्ती आग्रह. uis मनाला नियंत्रण नाहीस्क एकाच व॑र अत्याग्रह दाखिवणे चोखट /चोखोट नहो.
अत्यावश्य adj essential. अति अवश्य. मुख्य होऊन पह्जते. uis अमेरिकाला जाताना एरोप्ळेनांत एक-एकदनालीन एक सूटकेसांत बावीस किलोच सामान मात्र घेऊन जायाला सोडतात. ते करतां सूटकेसांत अत्यावश्याच सामान मात्र काढींगून जाम / जांव.
अत्युत्तम adj perfect. ideal. फार योग्य असाच. uis न्याय कचेरीच न्यायाधीश (जड्ज) निष्पक्ष स्वभावाच अत्युत्तम उदाहरणाच मनुष असाम / असांव.
अथवा conj or. अथवा. uis मझ घर चोखट मोलांत घ्याल एकले तय्यार होते. पण, विकामका अथवा विकणे नकोका म्हणून मी योचना करत आहें.
अदलाबदली n mixed-up. swaped. एकालेक बदलणे. uis सरकारी हॉसपिटलांत उजलते लेंकरांना अदलाबदली कराच विषय पत्रांत फारदपा येऊन पणीन ते अक्रम अत्त पतोरी उणे झाल नाही.
अदृश्य adj invisible. दिसनास्क॑ होणे. अप्रत्यक्ष होणे uis साळेंत एक जादूगराच कार्यक्रम होत॑. त्यांत तेनी एक ल्हान पोरीला अम्च डोळे समोरच अदृश्य करीवले.
अदृश्य adj unseen. दिसनाते. uis रात्रीच वेळ आकाशांत एक मनुषाला नुस्त दोळेंत तीन हदार नक्षत्र दिसेल. तजपक्षा कोटान-कोटी नक्षत्र अम्च डोलेला पडनास्क अदृश्य होऊन हे ब्रह्मांडांत आहे.
अदृष्ट n luck. भाग्य. uis मझ मित्राला अदृष्ट बडीवले. भूटान लाट्टरींत त्यांस पन्नास लाख मिळ्ळ॑.
अदृष्ट n fate. गेत. गत. कपाळच विधी. uis कित्येकदन अदृष्ट म्हणतात, कित्येकदन कर्म म्हणतात, काय झाल तरीन तेनी तेनी काय करलेकी, तज परिणाम तेनीच अनुभव कराम / करांव.
अद्भुत adj wondrous. आश्चर्याच. uis हे भूमींत जीव अपाप उजलते / झालते एक अद्भुत विषयेच.
अद्भुत adj wonderful. अद्भुत. uis दीपावलीला अत्तलीकडे विकाच नानाविध 'रोकेट' एकदम माघ असल तरीन आकाशांत अद्भुत रंगीं, डिसैनीं आणीवते. पाह्याला फार बेष / बश अस्त.
अद्भुत n wonder. अद्भुत. uis प्रकृतीच सृष्टी्च पक्षा मोठ अद्भुत वेगळ॑ कोण्तीनच नाही.
अद्वैत n monotheism. एकत्व. आदिशंकराचार्य प्रचार केलते सिद्धांत. uis अद्वैत सिद्धांता प्रकार जीवात्म-परमात्म दोनीं एकच असलतरीन अम्हाला ते वेगळ॑-वेगळ॑ अस वाटते. हे सर्वीन ईश्वराच माया म्हणून शंकराचार्य म्हणतात.
अधपतन n downfall. एक चोखट / चोखोट स्थितींतून नीच स्थिलीला येणे. अधोगत. uis एक राज्यांत अन्याय, अक्रम असल॑ अधर्म वाढलतर तज अधपतन फार दूर नाही म्हणूया.
अधर n lower lip. खालेच ओंठ. uis पंध्रवां शतकांत श्री वल्लभाचार्या श्री क्रिष्णाला स्तुती करून लिव्हलते "अधरम मधुरम, वदनम मधुरम" म्हणाच मधुराष्टकमांत देवाच वर्णना अधरमांतून आरंभ होत॑.
अधर्म n unrighteousness. धर्म, न्याय, नीती असल॑ गुणांच विरुद्ध गुण. uis अधर्म अधीक होताना भगवान विष्णू अवतार काढून पुन्हा धर्म स्थापना करतील अस हिंदू धर्म विश्वास करत॑.
अधर्म n (behaviour) contrary to religion or against accepted morality of society. धर्म अथवा समुदायाच विरुद्ध होयाच (कार्य). uis अत्ता समुदायांत होत असाच अन्याय, अक्रम हे सग्ळीन पाह्ताना अधर्म नियंत्रण कराला होयनाते एवढे वाढलाहे अस वाटत॑.
अधलामधे adj to come in between. to interfere. to intrude. मध्य पडणे. uis मीटिंग चालत असताना कित्येकदन अधलामधे बोलून चर्चांला गोंधळ करतात. असलते समस्या अधीकीन समूह-मंडळांत अस्त. ऑफीसांतल मीटिंगांत जास्ती अस्त नाही.
अधिकमास n an additional thirteenth month introduced every thirty-three months as a correction in the Hindu lunar calendar. प्रति तेहतीस महिने चंद्रमान पंचांगांत जोडाच तेरावां महिना. uis अधिकमासंत दान देलतर उदंड / उजंड पुण्य येईल म्हणून ते महिनेंत विध-विधाच साधनीं, तसच तेहतीस अपूपीन योग्य लोकांला दान देणे आहे.
अधिकवर्ष n leap year. फेबृवरींत॑ 29 दिवस असाच वर्ष. uis भारताच प्रधान मंत्री म्हणून होतते श्री मोरारजी देसाई फेब्रुवरी 29 तारीखला उजले अणी त्यंच ऐंशीच उजलादिवस आघोष करत असताना "मझ जन्म अधिकवर्षांत झालत्यामळे आज मझ वीसवां उजलादिवस" अस॑ म्हणट्ले.
अधिकार n authority. हक्क. निर्णय कराच जवाबदारी. uis एक राज्याच विषयांत मध्य पडाला वेगळ॑ कोण्त राज्यालीन अधिकार नाही.
अधिकारी n person with authority. officer. अधिकार असाच मनुष. uis सरकाराच विद्याभ्यास विभागाच अधिकारी लोक अम्च गांवाला येवून उजंड / उदंड दिवस झाल तरीन, हे पर्यंतीन एक चोखट / चोखोट साळे पणीन उघडले नाहीत.
अधिपती n master. lord. राजा. स्वामी. uis लंकापुरीच अधिपती असुर राजा रावणाला युद्धांत हरिवून श्रीराम सीतादेवीला मुक्त करले.
अधिरसम n a sweet preparation made from rice flour. तांदूळाच पीठांतून करलते एक गुळ्चीट पदार्थ. अनारस. अपूप. uis अधिरसम खायाला मला फार अवडल तरीन तज व॑र शिंपडून असाच खसखसा खालतर मला आंगाला होईना. Note. from Tamil.
अधीक adj more. जास्ती. फार. उदंड. उजंड ; अधिक in sm. uis पोटसूळांतून कष्टी भोगत असताना आवश्यापक्षा अधीक जेवणे चोखट / चोखोट नहो.
अधीकउणे adj more or less. थोड जास्ती अथवा थोड उणे. जास्ती व्यत्यास नाहीते ; अधिकाउणा in sm. uis हे वर्षाच पाऊस गेलवर्षाच बरोर तारतम्य करून पाह्ताना अधिकउणे तेवढेच होत॑ म्हणूया.
अधीकपक्ष n mostly. पोणावांटा. uis मला पाह्याला आज तो येतो म्हणून सांगिटल होता. पण, अत्ता रात्री होत आहे. अधिकपक्षा येईना म्हणून वाटते.
अधीकपक्ष n at the most. जास्ती-जास्ती. uis तू तेच योचना करून अवस्था भोग नको. अधीकपक्षा तुझ कडे असाचांत अर्ध तला देमते पडूया, एवढेच.
अधीकप्रसंग n uncalled for utterances. आवश्याच पक्षा अधीक बोलणे. अनावश्य बोलणे. uis अधीकप्रसंग करून करूनच तो तज नाव पूरा हाळ करींगट्लते. अत्ता कोणीन तला परवा करत नाहीत.
अधीकप्रसंगी adj one who utters unnecessarily. आवश्यापक्षा अधीक बोलणार. अनावश्य बोलणार. uis तज गोष्ट ऐकाला कोणालीन इष्ट अस्त नाही म्हणून कळींगून पणीन अनावश्य बोलून बोलून तो एक अधीकप्रसंगी झालाहे.
अधीन adj subjugated. स्वाधीन झालते. दुसरेंच अधिकारांत असाच. uis अम्च राज्य ब्रिटीष यांच अधीनांत सुमार दोनशें वर्ष होत॑.
अधैर्य adj lack of courage. lack of confidence. diffident. स्वंत शक्तीच व॑र धैर्य अथवा विश्वास नसणे. uis मझ काकाला मध्य-मध्य मेन्टल-डिप्रेशन येताना त्यंच तोंडांत अधैर्याच लक्षण स्पष्ट होऊन दि्सेल.
अधोगती n downfall. दुर्गती. अधपतन. uis चरस पीणे, भांग खाणे, मद्य पीणे सिगरट फुंकणे हे स्वभाव तेवढीन अत्ता तो नव होवून / नवविणी आरंभ केलसाच पाव्हून तज कुटुंबाच अधोगती आरंभ झालाहे म्हणून सांगूया.
अधोलोक n nether world. hell. पाताळ. नरक. uis रामायण युद्धाच समय एक रात्री श्रीरामालीन लक्ष्मणालीन अहिरावण विभीषणाच रूपांत येऊन अपहरण करून अधोलोकाला उचलींगून गेला.
अध्यक्ष n main person. नेता. मुख्य मनुष. uis ब्रिटिषयांचकडून स्वतंत्र झालानंतर अत्ता पर्यंतीन / पतोरी पाकिस्थानाच अध्यक्ष ते राज्याच सेनापती लोकेच पुन्हा-पुन्हा होत आहेत.
अध्यक्ष n presiding officer. मंडळीच प्रधानी. uis एक ठिकाणी मला कार्यक्रमाच अध्यक्ष म्हणून बलावल्होते, पण बरोरल वेळाला मी तिकड जाऊन पावताना एक चिटपांखरू पणीन तिकड होत नाही.
अध्यात्म n philosophy relating to soul. आत्मांच विषयाच तत्वज्ञान. uis वय होतां-होतां अम्ही संसाराच विषय सोडून आध्यात्मिक विषयाच व॑र ध्यान देणे चोखट / चोखोट.
अध्यात्मज्ञान n knowledge of philosophy of soul. अध्यात्म विशयाच ज्ञान. uis भारताच राष्ट्रपती म्हणून हेतते श्री सरवेपल्लि राधाक्रिष्णन एक थोर पंडित होते अणी आध्यात्मज्ञाना विषीन त्यनी लिवलते / लिव्हलते अनेक पुस्तक अत्ता पणीन अनेक महाविद्यालयांत प्रचारांत आहे.
अध्यापक n teacher. पंतोजी. विद्या शिकिवणार. विद्या शिकिवून देणार. uis हे वर्ष अम्च संस्थानांत दोन हदार / हज़ार अध्यापक नव होवून नियुक्त कराच उद्धेश आहे म्हणून विद्याभ्यास मंत्री गेल वार केलते प्रसंगांत सांगिट्ले.
अध्यापिका n lady teacher. विद्या शिकिवणारी. विद्या शिकिवून देणारी. uis पोरींच साळेंत शिकिवाला अध्यापिका कोणीं नाही म्हणून तीन महिना पसून मोठ गलाटा होत असाच खाणी मध्य मध्य टी.वींत येत आहे.
अध्याय n chapter. पुस्तकाच एक भाग. खंड. uis मझ मित्र एक नव पुस्तक लिव्हत आहेत अस ऐकून एक वर्ष झाल॑. काल अकस्मात मी त्यांस दुकानबीदींत मिळून बोलताना कळ्ळ॑, एक अध्याय पणीन पूर्त झाल नाही म्हणून.
अनवंठी n chin. the lowest part of the face. तोंडाच खालच भाग ; अनवठी in sm. uis एक थोर ट्रेन अपघातांतून चुकलले तरीन त्यंच अनवंठीला प्ळास्टिक सर्जरी करामते पडल॑.
अनशन n fasting. निराहार असणे. उपवास. uis आज एकादशी म्हणून पूरा दिवस अनशन करणार मी.
अनशीपोट n empty stomach. खाली पोट. uis चार घंटेच व॑र अनशीपोटांत असलतर पोटांत वायूच तंटा होऊया.
अनंत adj endless. eternal. अंत नाहीते. केम्हाईं वारनाते. निरंतर. uis हे ब्रह्मांडाला परिधी नाही अणी ते अनंत आहे.
अनंतचतुर्दशी n ananthavratha. a pooja performed to propitiate Lord Vishnu as reclining on Anantha. अनंतव्रत. अनंतशयन रूपी महाविष्णूला कराच एक पूजा. uis भाद्रपद महिनाच शुक्लपक्ष चतुर्दशीला अनंतचतुर्दशी सण येत॑.
अनंतव्रत n anantha chathurdashi. a pooja performed to propitiate Lord Vishnu as reclining in Anantha. अनंतचतुर्दशी. अनंतशयनरूपी महाविष्णूला कराच एक पूजा. uis वर्षावर्षी अम्ही अनंतव्रत सण अम्च घराच जवळ असाच श्री राघवेंद्रस्वामी मठांत जाऊन करलों.
अनंतशयन n Lord Vishnu. the Lord who reclines on Ananta. अनंतशयनरूपी महाविष्णू. uis श्रीरंगमांतल श्रीरंगनाथाच देऊळ अणी तिरुवनंतपुरमांतल श्री पद्मनाभस्वामीच देऊळ, हे दोन दिव्य क्षेत्रांतीन महाविष्णू अनंतशयन रूपांत आहे.
अनंतासन n a small pedestal kept inside a pooja mantap for placing God's idols. देवाच विग्रह ठिवाला म्हणून मंटपाच आंत ठिवाच एक ल्हान आसन.
अनाचार n inappropriate behaviour. ओंगळ /वंगळ वागणे. uis हे जवळ समुदायांत अनाचार अणी अक्रम उदंड जास्ती झालाहे.
अनाथ adj orphaned. माय-बाप नाहीते. uis त्यांस लेंकरे न्होत म्हणून एक अनाथ पोरीला दत्त घेटले.
अनाथ adj abandoned. आश्रय नाहीते. uis बीदींत असाच कुत्र, मांद्र असले अनाथ प्राणींला वाढिवाला एक नव संस्था आरंभ कराच योजना नगरपालिकाला आहे, अस मुख्य मंत्री सांगिट्लते मी पत्रांत वाचलों.
अनाथालय n orphanage. अनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथाश्रम. uis एक एक पटणांतीन सरकार अनाथालय उघडलाहेत तरीन ते चालिवाच रीतींत अण्कीन भरून सुधार आणाम / आणांव.
अनाथाश्रम n orphanage. अनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथालय. uis बायका पोरींला म्हणून एक अनाथाश्रम अत्ता-अत्ता नव होऊन अम्च गामांत उघडले.
अनायास adj effortless. कष्ट नाहीस्क. श्रम नाहीस्क. सुलूभ होऊन. uis रात्रीच वेळ चोराला घूंसलते घर एक पहलवानाच म्हणून चोर्टाला कळ्ळ॑ नाही. पहलवान तला अनायास उचलून बाह्येर भिरकावले.
अनारस n a type of sweet preparation. अपूप. अधिरसम. तांदूळाच पीठांतून केलते एक गुळ्चीट पदार्थ ; अनरसा in sm. uis अधिकमास दान करताना तेतीस अनारस पणीन देणे आहे.
अनारुंद adj wastrel. profligate. अवघड. uis ल्हान वयेंत बाप-मायेच उपदेश अवगणना करत होता. अता अनारुंद म्हणून हिंडत पडलाहे.
अनावश्य adj unnecessary. आवश्य नाहीते ; अनावश्यक in sm. uis अम्च वकीलाच मनांत तेनी थोर षाणे म्हणून होत॑. कोर्टांत मझ केस वाद करताना अनावश्य बोलून केस हरलांपिरी त्यंच तोंड ल्हान झाल॑.
अनावृष्टी n scanty or no rainfalls. पाऊस फार उणे पडाचकी, थोडकपणीं पडनास्क असाचकी अवस्था. uis गेल वर्ष पाऊसाळाच महिने पूरा संतत रिचिवाच पाऊस पडल॑, पण हे वर्ष एक पाऊस पणीन झाळ नाही. अनावृष्टी म्हणूनेच हेला सांगाम.
अनिश्चय n uncertainty. (मनाला) व्यक्त होवून कळनाते अवस्था. uis तीन दिवसापसून मोठ पाऊस पडत होत-ते-करतां एरपोर्ट झांकून आहे. एरोप्ळेनांच येणे-जाणे अनिश्चय झालाहे.
अनीती n against the laws. unlawful. न्यायाच विरुध. अन्याय. uis एवढे दिवस दुसरेंस एमारिवून जीवन चालिवलते मनुषाला अनीतीच वाटांतून सुटिवून सुधाराला त्यंच घरच लोक केलते प्रयत्न व्यर्थ झाल नाही.
अनुकंपा n compassion. दया. कारुण्य. uis ल्हान वयांतूनच तिन॑ मूकप्राणींच व॑र अनुकंपा दाखिवत होती.
अनुकूल adj agreeable. ओपाला योग्य असाच. uis तुम्हाला अनुकूल असलतर मला सहाय कराला होईलका ?
अनुकूल adj favourable. suitable. योग्य. uis हे वर्षाच पावसाळा / पाउसाळा क्रिषिधान्य उत्पादनाला अनुकूल असेल म्हण्तात.
अनुकूलता n favourable situation or condition. अनुकूल स्थिती. uis हे परिस्थितींत तुम्हाला पैसेच सहाय कराला होयना. पण, येयाच महिना अनुकूलता पाव्हून कायतरीन कराला पाह्तों.
अनुग्रह n blessings. आशिर्वाद. uis अम्च लेंकरे चोखट /चोखोट स्थितींत अहेत म्हणजे, ते अम्च थोरळेंच आनुग्रह अणी आशीर्वादामळेच म्हणून सांगाम / सांगांव.
अनुताप n repentance. remorse. पश्चाताप. खेद व्यक्त करणे. uis अपराध केला नंतर नुस्त अनुताप दाखिवाच पक्षा काहीं उपयोगाच काम करून दाखिवलतर प्रयोजन होईल.
अनुदिन adv every day. दिवसोडि. प्रति दिवस. दिवसों-दिवस. uis मझ ससरा अनुदिन देवपूजा करनास्क वेगळ एक कामीन करनात.
अनुभव n practical experience. वेगळ वेगळ वागाच रीत कळींगणे. uis गेल वार अम्च ऑफीसांत कॉळेजांतून अत्ताच वाचणे संपिवून आलते एक नव मनुषाला नियुक्त केले. त्यांस ऑफीस कामाच विषयांत एक अनुभवीन नाही.
अनुभव n to have and enjoy the possession or custody of (a thing). (एक वस्तू अथवा साधन) स्वता उपयोग करून परिचय घेणे. uis तिज दाल्ला एक नव कार घेट्ळा. एवढे दिवस स्कूटराच अनुभव तिला होत॑. अत्ता काराच अनुभव घेत आहे.
अनुभवी adj experienced. अनुभव असणार. uis अम्च देशाच प्रधान मंत्री अर्थशास्त्रांत थोर अनुभवी म्हणून सांगतात.
अनुमती n permission. approval. संम्मत. uis लोकतंत्राच पद्धत प्रकार देशांत एक नव नियम आणिवाला विधानमंडलाच अनुमती आवश्य आहे.
अनुमान n conjecture. ऊह. uis कोर्टांत अम्ही साक्षि देताना एक विषय स्वता कळ्लासलतरेच बोलाम / बोलांव. उगेच अनुमान करून बोलल॑ तर नंतर ते गोष्ट अम्हालाच उपद्रव देऊया.
अनुमान n inference. आधाराच व॑र काढाच निर्णय. uis एक वस्तू घेताना प्रमाण-पत्र पूरा बरोर वाचनास्क अनुमानाला येणे बर॑ नहो.
अनुयायी n a disciple (of a spiritual guru). शिष्य. uis एक हिंदू धर्मस्थापनाच गुरुजीच अनुयायी होयाला अनेक वर्षाच वेद पठन करल तरेच होईल.
अनुयायी n a follower (of a leader). नेताच मागे जाणार. uis कित्येक राष्ट्रीय पक्षाच नेतालोकांच बरोर येणार अनुयायी लोक विपरीत तंटा कराच स्वभावाच असतात.
अनुराग n affection. स्नेहभाव. uis तिला ते पोरावर उदंड प्रेम असलतरीन वेगळ॑ लोकांच समोर / सोमोर तिज अनुराग दाखिवाला फार संकोच भोगते / दाखिवते.
अनुराधा n name of a star. एक नक्षत्राच नाव. uis नक्षत्र मंडलांत अनुराधा सत्रावां नक्षत्र आहे.
अनुवाद n translation. तर्जुमा. भाषांतर. एक भाषाच लेख अण्खीएक भाषांत करणे. uis महाकवी काळीदास यांस पुरातन भारताच सगळ्यांचीन पक्षा श्रेष्ठ कवी म्हणून सांगतात अणी त्यंच नाटक-लेख अग्गीन अनेक भाषांत अनुवाद पणीन झालाहे.
अनुष्ठान n religious ceremony or ritual. पूजा अथवा पूजा सेवाच पालन. uis स्मार्त संप्रदायाच बरोर पाह्ताना मध्व संप्रदायाच अनुष्ठान थोडक जास्ती आहे, अस दिस्त.
अनुसरण n obedience. दुसरेंच इछाला संम्मत होऊन असणे. uis ल्हान वय पसूनच लेंकरांस अनुसरण शील शिकिवलतर थोरळे होताना त्यंच चोखट / चोखोट वागणे पाव्हून वेगळ लोक त्यांस मर्यादा देतील.
अनुसार prep in conformity with. in accordance with. (ते) प्रमाण. uis आस्ट्रेलियाच बरोर झालते क्रिकेट परंपरांत भारताच खेळ फार उणाका होत॑. खेल आरंभ होयाच पुढे केलते योजनाच अनुसार खेळलासलतर हे अवमान झालासना.
अनेक adj more than one. many. एकापक्षा जास्ती. भरून. uis अनेक वर्गाच लोक अणी अनेक रीतीच भाषा बोलणार, हे विषयांत भारत देशाच पक्षा अधीक असाच देश भूलोकांत वेगळ कोण्तीन असना.
अनेक adj many. भरून. उदंड. उजंड. दंड. uis कित्येक समुदायांत कोणीं परदेशाला जाताना अनेक लोक येऊन तला एयरपोर्ट अथवा रेलवे स्टेषनांत पाठिवून द्याच पाव्हूया.
अन्थूण n mattress. bed. अंथरूण. अण्थूण. लेप. निजाला उपयोग कराच एक साधन. नाहली. uis (1) जुने कालांत लोक जास्ती-जास्ती कापूसाच अन्थूण घेत होते. अत्ता ते सोडूनटाकून रब्बरांतीन कोयरांतीन करलत मॅट्रेस घ्याला आरंभ केलाहते. (2) मला उदंड दिवसा पसून माद सूळ होत॑. मझ जुने अन्थूण काढूनटाकून एक चांपाच वर निजाला आरंभ करला नंतर ते सूळ अपाप राहून गेल॑ / सुटल॑.
अन्न n cooked rice. भात. शिजिवलते तांदूळ. uis भाताला अन्न म्हणून अण्कीन एक नाव आहे तरीन, साधारण बोलींत भात म्हणूनच अम्ही सांगतों.
अन्नदाता n benefactor. दान-धर्म करणार. uis तमिलनाडाच जुने मुख्य मंत्री एम.जी. रामचंद्रन सिनिमांत अभिनय करत होतते वेळांतेच, म्हण्जे मुख्य मंत्री होयाच पुढेच, दरिद्र लोकांला फार सहाय करत होते. हेला एक कारण होते म्हणून विरोध पक्षाच लोक सांगतात. तेनी एक अन्नदाता आहेत म्हणून लोकांच मनाचांत राह्यलतर जनतंत्रांत त्यांस पुढे उपयोग होईल, हे करतां तेनि अस केले म्हणून सांगतात.
अन्नदान n food aid. food distribution. जेवाच पदार्थ आवश्य अहेत लोकांला वितरण करणे. uis यंदा उत्तर प्रदेश अणी बीहारांत पाऊसाळाच अतीवृष्टी होवून भयंकर प्रळय झाल॑. दोन संस्थानातीन अनेक ठिकाण पाणींत बुडून खेडेगांवाच लोके तिकडे-तिकडे सांपडींगून दोन-तीन दिवस खायाला काहीं नाहीस्क अवस्था भोगले. केंद्र सरकाराला सेनाच हेलिकोप्टर उपयोग करून त्यांस अन्नदान करामते पडल॑.
अन्नप्राशन n ceremony marking feeding of rice to an infant for the first time. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण. अन्नमुहूर्त. uis अम्ही मुंबईंत असताना अम्च लेंकीच अन्नप्राशन जोगेश्वरींत असाच श्री राघवेन्द्रस्वामी मठांत करिवलों.
अन्नमुहूर्त n ceremony marking feeding of rice to an infant for the first time. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण. अन्नप्राशन. uis साधारण होऊन अन्नमुहूर्त सण लेंकरे सहा अथवा सात महिने अस्ताना करणे आहे.
अन्य adj another. वेगळ. दुसर॑. uis अन्य देशाच लोक अम्च देशांत घूंसून समुदायांत अक्रम, अस्वस्थता हे सग्ळ॑ पसराला सोडनास्क॑ पाह्यींगणे, सरकाराच जवाबदारी आहे.
अन्याय n injustice. अनीती. uis अन्याय काहीं होयना म्हणून पूरा विश्वास आलांपिरीच मी ते नव मंडळींत मिळाला निश्चय करलते.
अन्याय n an illegal act. न्यायनीतीच विरुद्ध काम. अपराध. uis पेट्रोळांत केरोसीन मिळिवून विकाच अन्याय करणारांला एक दिवस पोलीस धरतील.
अन्याय n an offence. a crime. impropriety. अपराध. uis बाजू घरच दंपती मध्ये थोर भांडा-भांडी होऊन तिजवर लटक अपराध सांगून घरांतून बाहेर लोटलते एक अन्याय म्हणून लोके सांगतात.
अन्याय fig disproportionate to reason or law (in a negetive sense). साधारणापक्षा फार जास्ती. uis मझ नातू अन्याय तंटा करतो म्हणून मझ लोंक तला सदाहीं शिवा देत अस्तो.
अन्योन्य adj reciprocal. mutual. एकालेक. परस्पर. uis दीपावळीच दिवसी आंग पूरा तेल लावून माखींगाच पुढे अम्हाला सर्वानीं मिळून आर्ती काढताना अम्मा सांगतील "तुम्ही भाऊ-भावंड मोट्ठ॑ झाल तर पणीं केम्हाईन अन्योन्यांत असाम॑".
अन्योन्य adj mutually amicable. एकालेक विरोध नाहीस्क असणे. uis मत भेद नाहीस्क सर्वदनीं अन्योन्य होऊन असाम / असांव.
अन्वेषण n inquiry. investigation. विचारणा. uis अम्च गांवाच / गामाच तहशीलदार एक वर्ष सस्पंन्षनांत होते. नंतर झालते अन्वेषणांत त्यंचवर केलते अपराध कोण्तीन खरे नहो म्हणून झाल॑.
अन्वेषण n search. हुडुकणे. uis जैलांतून पळून गेलते कैदीच अन्वेषण सहा महोनेंत्सून चालत आहे तरीन, अता पतोरी पोलीसाला एक विवरीन मिळ्ळ॑ नाही.
अपकार n a misdeed. उपकाराच विरुद्ध. दुस्सहाय. uis तुझ चुलतभाऊ एक अवघड मनुष म्हणून कळ्ळकी. उपकार करतों म्हणून सांगून केलते पूराहीं अपकारेच. मग कां तला घराच आंत सोडलीस ?
अपकीर्ती n infamy. ill repute. ओंगळ / वंगळ नाव. uis अम्च मानमर्यादा राखिवाम / दाखिवांव म्हण्जे अम्च नावाला एक अपकीर्तीहीं येईनास्क पाह्यींगाम.
अपघात n accident. अकस्मात झालते दुर्घटना. आपत. आफत. uis बीदींत एक अपघात झालतर, ते मनुषाच जीव रक्षा करापक्षा लोके तिकड नुस्त गुंपगुंडाळत तमाषा पाह्त असतील.
अपभ्रष्ट adj that which has become corrupted. degenerated. अपभ्रंश झालते. uis तंजावूर-मराठी पुने-मराठीच एक अपभ्रष्ट रूप म्हणाच चूक आहे, कां म्हणजे, सोळावां सत्रावां शतकाच नंतर ळतंजावूर-मराठी एक वेगळ गतींत पुढे गेल॑ अणी तमिल भाषाच संपर्कामळे तला आजच रूप आल॑. म्हण्जे, सत्रवां शतकाच नंतर हे दोन भाषाईं वेगळ वेगळ गतींत पुढे गेल॑ अणी दोनांमध्य संपर्क फार उणे होत॑.
अपभ्रंश n corrupted word or language. मूल रूपांतून वेग्ळळ॑ होऊन विकार झालते शब्द, अथवा भाषा. uis तंजाऊर मराठी बोलणर लोके त्यंच भाषा लिव्हाच दंडक सोडूनटाकले अणी पुढच॑ एक एक पिढीलीन ते भाषाच लिपी कळाला अवसर मिळ्ळ॑ नाहीतेमळे गोष्टाच उचारण अपभ्रंश होत गेल॑.
अपमान n insult. disrespect. अवमान. uis अम्च आफ़ीसाच मॅनेजराला आवश्य नाहीस्क दुसरेंना अपमान कराच स्वभाव आहे.
अपमान n shame. अवमान. uis तिज वर आलते अपमान सोसाला होईनास्क तिन आत्महत्या कराला प्रयत्न करली.
अपमान n disgrace. humiliation. अवमान. uis दुसरेंना उगे उगे अपमान करून बोलाच कोणालीन अवडना.
अपराध n offence. crime. गुन्हा. अन्याय. दोष. uis पांडवांच विरुद्ध करलते अन्याय सग्ळीन अपराध म्हणून ओपींगाला दुर्योधन तय्यार न्होता.
अपराधी adj guilty. चूक करलते. uis शिक्षा अनुभव कराच अपराधी प्रायश्चित्त करलतर पुढे समुदायाला एक उपयोगी होयाला साध्य आहे.
अपरूप adj rare. uncommon. अप्रूप. अपूर्व. असाधारण. uis अम्च घराला अपरूप आले म्हणून त्यांस उदंड उपचार करलों.
अपलपोटी adj selfish. स्वार्थ. स्वंत काम मात्र पाह्यींगणार. uis तो एक अपलपोटी मनुष. तज काम कायतरीन असलतर मात्र लाडी-गोडी बोलाल एईल.
अपवाद n slander. लटक आरोप. uis स्यमंतकमणी चोरलते अपवादांतून चुकाला श्रीक्रिष्णाला कठिन श्रम करांमते पडले.
अपशकुन adj ill-omen. ओंगळ / वगळ शकु्न. uis एक चोखट / चोखोट कामाला बाहेर जाताना तीघदन मिळून घरांतून निघलतर ते एक अपशकुन आहे अस म्हणणे आहे.
अपसव्य adj left side. डावि. uis पित्रु श्राद्ध करताना कित्येकदपा जानव अपसव्य करणे आहे. म्हण्जे, उजव॑ खांदाच वरून आरंभ होऊन डावी हाताकडे जात॑.
अपसव्य adj contrary to custom. साधरणाच विरुद्ध. uis श्राद्ध करताना जानव भरूनदपा अपसव्य कराच्याला प्राचीनाविधी म्हणून सांगणे पणीन आहे. Note. like in the case of putting the sacred thread over the right shoulder or doing pradakshina in the anti clockwise.
अपस्वर n false note. चुकलते स्वर. uis संगीत कच्चेरी आरंभ कराच पुढे अपस्वर होयनास्क॑ असाला सग्ळ॑ वाद्यहीं वाजीवून पाह्याच दंडक आहे.
अपस्वर fig unpleasant utterance. अवघड गोष्ट. uis कोणीं एक चोखोट / चोखट विषय बोलताना मध्य पडून अपस्वरास्क बोलाच वंगळ / ओंगळ स्वभाव तला आहे.
अपहरण n abduction. बलप्रयोग करून घेवून जाणे. uis सीतादेवीला अपहरण कराला येताना रावण एक सन्यासीच वेष घालींगून आला.
अपहरण n stealing. चोरणे. uis चोर्टे लोकांस॑ एवढे धैर्य आलाहे म्हण्जे, पुढे मादिरी रात्रीचवेळ मात्र नहो, अत्ता पाष्टेच वेळपणीं अपहरण कराला आरंभ केलाहते.
अपहास n ridicule. मष्करी. मस्करी. परिहास. उपहास. uis वेगळांस पाह्यिलतर अपहास करून बोलाच वंगळ / ओंगळ दंडक तला आहे.
अपाप adv by oneself. स्वता ; आपोआप in sm. uis घरांत वाढिवलते मांद्राला /मांदराला दूर नव ठिकाणि सोडलतरीं ते अपाप परतून वागलते घराला येईल.
अपाप adv spontaneously. स्वता. uis (1) मी काल संध्याकाळी रेडियोच गाणे ऐकत असताना ते अपाप राहून गेल॑. (2) उन्हाळाच दिवस कित्येकदा राणांत अपाप विस्तू पेटाच संभव आहे.
अपाप adv automatically. स्वता. uis मझ कंप्यूटर दोन दिवसापसून हाळ झाल्होत. आज ते अपाप बर॑ झाले.
अपाय n danger. हानी. uis तिरुपती डोंगूरांतून परतून उतरताना अम्च बस्साच ब्रेक नासून गेले. बस हांकणाराच षाणपणामळे / सामर्थ्यामळे मोठ अपाय काहीं होयनास्क चुकींगटलों.
अपाय n damage. loss. नष्ट. uis चंद्राला पाठिवलते "चंद्रयान-2" शून्याकाश वाहन चंद्रांत उतरताना कायीन अपाय होईना म्हणून प्रार्थना कारूम्हणे.
अपार adj immeasurable. भरून. उदंड. उजंड. uis एक-एक आजा-आजीलीं त्यंच नातूंडे अपार बुद्धिवंत आहेत, अस वाटाच सहजच.
अपूप n a type of sweet preparation. अनारस. अधिरसम. तांदूळाच पीठांतून केलते एक गुळ्चीट पदार्थ. uis अधिकमास दानाला तेतीस अपूप पणीन देणे आहे.
अपूर्ण adj incomplete. पूरा झाल नाहीते. uis भारताच जनतंत्र कक्षींच मध्य महिलांस विधान सभांत कित्ति वांटा स्थिर होऊन द्याच, हे चर्चा अत्ता पतोरी अपूर्ण स्थितींतच आहे.
अपूर्व adj unprecedented. आत्ता पर्यंतीन / पतोरीन झाल नाहीते. uis मध्य भारताच रेवा राज संस्थानाच राणांत अपूर्व होऊन एक पंढ्र रंगाच वाघाला पहिलंदा दिसल॑.
अपूर्व adj rare. uncommon. अपरूप. अप्रूप. असाधारण. uis अत्ता अनेक देशाच मृगशालेंत पंढ्र रंगाच वाग आहे. ते एक अपूर्व विषय नहो.
अपेत्र adj unworthy (to be a recipient). (देणगीला) अयोग्य असणार. लायक नाहीते. नलायक ; अपात्र in sm. uis दंपती लोकांस देणगी देताना बरोर पाव्हूनच देम॑, कां म्हणजे तेनी अपेत्र असलतर अम्हाला पुण्यफल मिळना.
अपेक्षा n an earnest request, desire or expectation. गाढ इच्छा, विनंती अथवा आग्रह. uis हे कैदीच केस कचेरींत विचारणाला आलतम्हा कैदीच वकील न्याधीशाला / जड्जाला कैदीला जाम्यांत सुटिवून द्याला अपेक्षा करले.
अपेक्षा n an application for an employment, admission etc. अपेक्षा. uis सरकाराच नव सूचना प्रकार कृषी विभागाच टैपिस्ट-स्टेनोग्राफराच उद्योगाला अपेक्षा-फ़ॉर्म पोंचिवाच शेवटीच दिवस अण्खीन तीस दिवस पुढे केलाहते.
अप्पचि n squeezed to flatness. चपटा. सपाट. चेंपून सपाट करणे. चेंचून सपाट करणे. uis कित्येक लेंकरांस नव टूत-पेस्ट हाती मिळूनगेलतर समेच/सवेच ते अप्पचि कराला एक विधाच संतोष येत॑. Note. (1) from Tamil. (2) चपटा of Tamil is सपाट of sm / DM
अप्पि-पायसम n a type of sweet porridge. एक रीतीच खीर. अप्पीच खीर. पापडाच खीर. uis कोण्त थोर सण आलतरीन अmc अम्मा अप्पि-पायसम अणी आंबोडे हे दोनीन करूनच सरतील.
अप्पिंगणे vt to daub or smear nore that what is necessary. आवश्या पक्षा जास्ती लावींगणे. uis मझ बहिणी चुम्मण पोरी अस्ताना अपाप शृंगार करींगते म्हणून तोंड पूरा पौडर अप्पिंगून येईल.
अप्पीच खीर n a type of sweet porridge. एक रीतीच खीर. अप्पि-पायसम. पापडाच खीर. uis अप्पीच खीर अणी पापडाच खीर हे दोनां मध्ये थोडक व्यत्यास आहे तरीन साधारण होऊन एक एक सांगीट्लतर अण्कीएक म्हणींगतात.
अप्पून-तप्पून adv inadvertently. unintentionally. not by design. by chance. चुकून-माकून. उद्देश नाहीस्क. योचना करनास्क. uis मला कळून तो वाचणेंत शाणा / षाणा काहीं नहो. कस की अप्पून-तप्पून परीक्षा जिंतला. Note. Tamil origin (अप्पि-तप्पि).
अप्रत्यक्ष adj vanish. invisible. दिसनास्क होणे. uis साळेंत एक जादूगराच कार्यक्रम दोन दिवसाच पुढे झाल॑. त्यांत तेनी एक ल्हान पोरीला अम्च डोळे समोरच / सोमोरच अप्रत्यक्ष करीवले.
अप्रूप adj rare. uncommon. अपरूप. अपूर्व. असाधारण. uis (1) जुने काळच अप्रूप झालते नाण्य अणी तपाल-स्टॅम्प हे काळांत मिळणे फार कष्ट झालाहे. (2) तेनी थोर मनुष. अम्च घराला येणे फार अप्रूप झालाहे.
अप्सरा n a class of celestial courtesans. water nymphs. देवलोकाच सुंदर स्त्री. uis स्वर्गलोकाच अप्सरा मेनकाचीन विश्वामित्रऋषीचीन लेंक होऊन शकुंतला उजली. Note. the etymology being अप् (water)+सरा (movement) ie, gamboling or froliking in water.
अबद्ध n blunder. चूक. uis ब्रिटिष राज्याच ईस्ट-इंडिया कंपनीला मुगळ साम्राट जहांगीर भारतांत व्यापर कराला अनुमती देलते एक अबद्ध झाले म्हणून नंतरल॑ इतिहासांतून कळते.
अभय n protection. शरण. रक्षा. uis परदेशांच अभयांत असलते अनेक राज्य दुसर लोकयुद्धाच नंतर स्वतंत्र झाल॑.
अभय adj fearless. brave. धैरी. भें नाहीते. uis युद्धभूमींत शत्रूच समोर /सोमोर अत्यंत अभय होऊन राज्याच रक्षा करणार सैनिकाला केंद्र सरकार "परम वीर चक्र" पदक देतात.
अभंग n hymn. देव स्तुतीच भक्ती गाणे. एक रीतीच भजन. uis पांडुरंग विठ्ठलाला स्तुती करून सांगट्लते अभंग फार लोकप्रीय होयाला एक मुख्य कारण तजांतल॑ भक्तीरस आहे.
अभिनय n acting a part in a play, cinema etc. नाटक नाहीतर सिनिमांत एक पात्राच भाग करणे. uis सिनिमांत अभिनय कराला शिकिवाच एक संस्था पुणेंत आहे.
अभिनय n name of a concept in classical Indian dance. नाट्यशास्त्रांत एक कल्पनाच नाव. uis कथकळी नृत्य-नाटकांत अभिनय रसाच पक्षा मुद्राच उपयोगाला प्रामाण्य देतात.
अभिनंदन n congratulations. अभिवादन. प्रशंसा. स्तुती. uis सचिन टेंडूळकर सौत आफ़्रिकाच विरुद्ध 20-20 क्रिकेट खेळांत दोनशे रण मारताना राष्ट्रपती अण्खी प्रधानमंत्री हेनी दोघीन अभिनंदन करले.
अभिप्राय n opinion. विचार. uis एक विषयाचवर चर्चा होत असताना अम्ही अम्च स्वंत अभिप्राय व्यक्त करलांपिरी तज व॑र दृढ असणेच चोखोट /चोखट.
अभिमान n pride. योग्य गर्व. uis तंजाऊर मराठी भाषा पुढे सुधाराम म्हण्जे हे भाषा बोलणार लोक त्यंच मातृभाषाच व॑र अभिमान दाखिवाला पह्जे.
अभिवादन n homage. अभिनंदन. uis डा. अब्दुळ कलाम देशाच राष्ट्रपती असताना त्यंच सरळ स्वभाव अणी देशाला विज्ञानांत एक मोठ नाव करीवाला युव जनाला प्रोत्साहन कराच पाव्हून त्यांस पूरा देशाच अभिवादन मिळत होत॑.
अभिवृधी n improvement. उद्धार. uis भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होताहे तरीन, अनेक विषयांत अण्खीन अभिवृधी होयाच आहे.
अभिषेक n pouring consecrated offerings on God's idol. देवाच विग्रहाच वरून पंचामृत/सोन॑ असले पदार्थ घालून पूजा करणे. uis अम्च॑ घरांत कोणाच उजलादिवस आलतरीन ते दिवस पाष्टे श्रीराघवेंद्रस्वामी मठांत जाऊन पंचामृत अभिषेक करणे आहे.
अभ्यास n practice. एक काम/कार्य पुन्हा-पुन्हा करून तज विषीं बेष/बेश कळींगणे. uis कोण्त॑ विषय झालतरीन फार अभ्यास करनातर॑ ते पूरा स्वाधीन कराला होयना.
अमक्कळ n chaos. disorder. गोंधळ. uis अम्च वठारांत राहणार लोक आजू-बाजूच कित्येक कार्य कस सांभाळाम /समाळाम, हे निश्चय कराला एक सभा बलावून चर्चा करले. मझ बाजू घर्च मनुषाच मूर्खपणामळे सभांत अमक्कळ होऊन एक निर्णयपणीं काढाला झाल नाहीस्क झाल॑. Note. from Tamil.
अमच॑ pron our. ours. अम्च. अम्हाला संबंध झालते. uis एवढे वर्ष अम्ही भाडेच घरांत राह्त होतो, अत्ता पुढच महिनापसून अमच॑ स्वंत घराला घरप्रवेश करींगून सरकाला जातों.
अमर adj immortal. चिरंजीवी. uis हे भूलोकांत जन्म काढलतर एक दिवस मरामतेच. कोणालीन अमर असाला होईना.
अमावस्या n new moon day. क्रिष्णपक्षाच शेवट्ल॑ दिवस. uis अमावस्य दिवस केळे संपाकांत वापरणे श्रेष्ट म्हणून सांगणे आहे.
अमुक adj a particular (one). कोण्तीन एक. प्रत्येक ; अमका / अमुक in sm. uis मला तुम्ही दहा पंध्रा काम एकच वेळ सांगिट्लतर मनांत गोंधळ होईल. मझकडून काम नीट करिवाच असलतर अमुक काम करा अस सांगा.
अमुकअमुक adj certain specified (things). प्रत्येक-प्रत्येक काढून सांगट्लते ; अमकातमका / अमुकतमुक in sm. uis उद्या घरांत बनशंकरीच पूजा आहे. आज पाष्टे आचारे घराला येऊन पूजाला पह्जते अमुकअमुक सामग्रींच विवर एक कागदांत लिव्हून देवून, ते सग्ळीन आज संध्याकाळीच / सायंनकाळीच पुढे तय्यार करून ठिवांत म्हणून सांगूनटाकून गेले.
अमृत n celestial nectar, imbibing which one attains immortality. अमृत. देवलोकाच श्रेष्ट पानीय. हे पीलतर चिरंजीविविणी असूया. uis निरंतर वांचाला अम्ही कोणीं अमृत पीवूनटाकून आल नाही. तजमळे हे भूलोकांत अम्च असणे-वागणे सर्वीन बरोरल दृष्टींतून असाम.
अमोर-सोमोर adv face-to-face. अमोर-समोर. सोमोर-सोमोर. समोर-समोर. uis अम्च मध्ये मनस्थाप उदंड दिवसापसून आहे. अण्कीन अस असणे बरोर असना म्हणून अमोर-समोर बसून पूरा विषय बोलून व्यक्त करींगम्हणे. Note. सोमोर of DM is spelt as समोर in sm.
अम्च pron our. ours. अमच. अम्हाला संबंध झालते ; आमचा in sm. uis हे सोनेच माळ अम्च नहो. तिला ते परतून देऊनटाक.
अम्च-अम्च pron belonging to each of us. अम्ही एक-एक दनांचीन / व्यक्तींचीन. uis अम्च-अम्च काम व्यवस्थांत करत गेलतर पुरे. तेवढीन बरोर होईल.
अम्मा n mother. माय ; माता / आई in sm. uis दक्षिणी मराठी बोलणार पोणावांटा लोकेनीं त्यंच मायाला अम्मा म्हणून बलवतात, तरीन कित्येकदन आई म्हणून बलावतात.
अम्ही pron we. अम्ही ; आम्ही in sm. uis आज संध्याकाळी सहा बडिवाच पुढे / वाजिवाच पुढे अम्ही तुला पाह्याला येतों.
अम्ही-अम्ही pron we by ourselves. अम्ही स्वता. अम्ही अपाप. uis अम्च देश उद्धार होम म्हण्जे अमेरिकाकी वेगळ देशकी अम्हाला सहाय करतील म्हणून बसलतर होईना. अम्ही-अम्ही कायतरीन केलतरेच होईल.
अयनक n spectacles. reading glasses. वाचाच अर्सा. उपनेत्र. uis मी मझ पंध्रावां वय पसून अयनक वापरत / घालत आहें.
अयितवार n Sunday. आयितवार. आदित्यवार. रविवार. भानुवार. uis रिटैर झाल नंतर एक एक दिवसीन अयितवारास्कच दिसते मला ! Note. आदित्य, रवी अणी भानू, हे तीनीं सूर्याच नाव आहे अणी आदित्याच अपभ्रष्ट रूप आहे "अयित" अथवा "आयित".
अयोग्य adj improper. unbecoming. unworthy. योग्य नाहीते. uis भारताच महिला हॉकी संघाच कोचाच वागणे अयोग्य होत॑ म्हणून सरकार त्यंच व॑र एक अन्वेषण आरंभ कराला निश्चय करलाहेत॑.
अयोग्य adj unsuitable. unfit. unqualified. लायक नाहीते. नलायक. uis नव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारी ते पदवीला / स्थानाला अयोग्य अहेत अस निश्चय करून तला कामांतून काडूनटाकले.
अयोग्यता n unworthiness. योग्याला अर्ह नाहीते. uis नव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारीला ते विभागाच नियम काहीनच कळना अणी त्यंच अयोग्यता पाव्हून त्यंच खाले काम करणार अग्गिदनीन त्यंच व॑र थोडकपणीन मर्यादा दाखिवत नाहीत.
अय्यो interj oh! अरे ! uis अय्यो ! मी तला ते काम कर नोको म्हण्ट्लोंकी, मग॑ कां करला ? Note. from Tamil.
अय्यो-कुय्यो interj an expression indicating lazyness, reluctance or unwillingness to act. शोंबेरिपण, आळस नाही, काम कराला सम्मत / उद्देश नाही म्हणून दाखिवाच गोष्ट. uis ते काम कर रे म्हणून मी तला भरून दपा सांगामते पडले. नंतर अय्यो-कुय्यो म्हणून कायकी अर्धगछ करून ठिवलाहे. Note. from Tamil.
अय्यय्यो interj a double emphasis of अय्यो. अय्योच पुन्हस्पष्टपण. अरेरे ! uis अय्यय्यो, कां तस करला ? Note. from Tamil.
अरटे n gossip. idle talk. हरटे (Kannada). अमुक विषय नाहीते बोली. ; गप्पा in sm. uis अम्च शेदारल॑ घरचांस तीन सून आहेत, ते तीघीन अरटे बडिवणेंत एकापक्षा एक उणे काहीं नाही ! Note. from Tamil. The corresponding Kannada word is हरटे.
अरटे बडिवणे vt to gossip. हरटे-बडिवणे (Kannada). अमुक विषय नाहीस्क बोलणे ; गप्पा मारणे in sm. uis मझ एक मित्र आहे. तो अरटे बडिवाला आरंभ केलतर संपिवनाच संपिवना ! Note. from Tamil.
अरण्य n forest. राण. वन. uis अरण्य विभागांत मला कळ्ळते एक थोर अधिकारी आहेत.
अरळू-मुरळू adj incoherence in speech. बोलाच रीतींत येयाच अव्यक्तपण. uis कित्येकदन वय होतां-होतां बोलाच अणी योचना कराच शक्ती उणे होऊन अरळू-मुरळू होतील.
अरव n Tamil. तमिल भाषा. uis मला अरव बोलाला येत तरीन, वाचालीन लिव्हालीन कळना.
अरवा adj Tamil man. तमिल मातृभाषाच मनुष. uis गेल सहा महिने पसून अम्च घरच॑ व॑रच खोलींत डॉक्टर परीक्षाला बसणार एक पोर राह्यलाहे. तो एक अरवा. Note. around 1700 CE. the word अरवा meant "one who is not of us", ie, an outsider.
अरविंद n lotus. कमळीच फूल. uis राजीव अणी अरविंद हे दोनीन कमळीच फूलाच दुसर नाव आहे.
अरवीण adj Tamil woman. तमिल मातृभाषाच बायको. uis दिवसोडी भाजीपाला विकाला एकली अम्च घराला येईल. तिन एक अरवीण.
अरसा n mirror. अर्सा. प्रतिबिंब दिसाच अरसा ; अरसा / आरसा / अरशी in sm. uis अरसा खाले पडून मोडलतर, ते एक अपशकुन म्हणून सांगतात.
अरसा n glass. नुस्त अर्सा ; काच in sm. uis बीदींत थोर ॲक्सिडन्ड होऊन तिकडे पूरा अरसाच चूर पडलाहे.
अरसा n spectacles. अर्सा. अयनक. उपनेत्र ; चष्मा in sm. uis मी बाह्येर / बाहेर गामाला जाताना घालींगून असाच अरसा विना हातराखणेला अण्कीन एक अरसा केम्हीन काढींगून जाणे आहे.
अरुण n the divine personification of the pre-dawn reddish glow in the eastern horizon, announcing the rising of the Sun god. अरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे पूर्व दिशांत प्रत्यक्ष होयाच तंबड रंग. uis भारतांत पहिल पहिल पाष्टे अरुण प्रत्यक्ष होयाच ठिकाण झालत्यामळे अरुणाचलप्रदेशाला ते नाव ठिवले.
अरुण n charioteer of Sun god. सूर्यदेवाच सारथी. uis सूर्यदेवाच सात घोडाच रथ पळिवाच अरुण, कष्यप ऋषीचीन विनिताचीन लोंक म्हणून विश्वास आहे.
अरुणोदय n the time of sun rise. सूर्योदयाच वेळ. uis शेतींत काम करणार कुणबी, नांगरणार असलतेनी अग्गीन अरुणोदयाच वेळी कामाला जातील.
अरुणोदि n day-break. dawn. early morning. अरुण उदय होयाच वेळ. दुस्तपारी. uis अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यलतर उणीवता /चिरढे /एळक्कारम अस्त.
अरुंधती n name of a star in the constellation of Ursa Major. सप्तऋषी नक्षत्रसमूहांत एक नक्षत्राच नाव. uis (1) सप्तऋषी नक्षत्रसमूहांत जोडीनक्षत्रांत एकाच नाव अरुंधती अणी दुसरेच नाव वसिष्ट म्हणून आहे. (2) वराड झल समेच नव दंपतींला अरुंधती नक्षत्र दाखिवाच एक पद्धत आहे. Note. अरुंधती and वसिष्ट corresponds to the binary stars of Alcor and Mizar of the constallation of Ursa Major, the Big Dipper. The specialty of this binary system is that both the stars revolve around each other, unlike a normal binary where one star revolves around the other. Thus the purpose in seeing the binary of अरुंधती and वसिष्ट in a Hindu wedding tradition is to emphasise the equal importance of each spouse in a wedlock.
अरुंधती n wife of Sage Vasishta. वसिष्ट ऋषींच पत्नी. uis अरुंधती अणी वसिष्ट ऋषी हे दोघीन एक उत्तम जोडीच उदाहरण आहेत म्हणून वराड झालते दंपतींला अरुंधती नक्षत्र दाखिवणे आहे.
अरे interj a manner of addressing a person (in a condescending manner). एकलाला बलावाच रीती (थोड तुच्छांत). uis अरे, अत्ता बाह्येर गेलतर केम्हा पर्तून येशील तू ?
अरे interj the exclamation, oh!. अय्यो (Tamil). uis अरे ! तू इकडे बसलाहेस का, मी पाह्यलोंच नाही की !
अरेरे interj a double emphasis of the exclamation अरे. (Tamil). अरेच पुन्हस्पष्टपण. uis अरेरे, तू इकडे बसलाहेस का, मी पाह्यलोंच नाही की !
अर्क n a decoction of coffee. कॉफीच पूडांतून काढलते रस. कॉफीच काढा. uis चिकोरी मिळिवलतर कॉफीच अर्क अण्कीन थोड घट्टि होईल.
अर्क n a herbal decoction. वनस्पतीच काढा. uis आयुर्वेद औषध / ओखद तय्यार कराच ठिकाणाच जवळ जातानाच वनस्पतीच अर्काच चोखट घम्मग वास कळूनजाईल.
अर्क n essential oil or essence extracted from certain plants. कित्येक वनस्पतीच द्रव रूपाच सत्त॑ (सत्व). uis वनिलाच अर्क मिळिवलते दर्बूजाच मिल्क-षेकांत नंखर मीठ घालून पीयाला बेष असेल.
अर्क n a plant belonging to the sollow-wort or milk-weed family.रुई. रुईच झाड (हे झाडाच पान रथसप्तमीच दिवस कराच सणाच स्नानाला येते). uis हिंदू संप्रदयांत अर्क एक विशेष झाड म्हणून आहे. हेज पान रथसप्तमीच दिवसी आंघोळिला उपयोग करतात. तसेच, अर्क झाडाच काठीच मध्य भागांतल पंढ्र रंगाच "पित्तांतून" केलते देवाच विग्रह फार विशेष म्हणतात.
अर्घ्य n oblation (of water, milk etc) to Gods. पूजाच पाणी अथवा दूध मंत्र सांगत उद्धरणींतूं हातावाटी अर्घ्य पात्राला (पेलांते / प्यालांते) सोडून देवाला स्मरण कराच पद्धत. uis गोकुलाष्टमी सणांत लिंबू अणी पैसाच नाण्यांत अर्घ्य सोडाच पद्धत आहे.
अर्चना n worship. पूजाच एक भाग. uis अग्गि (अस्कि / सर्व) देऊळांतीन प्रत्येक-प्रत्येक कुटुंबाला स्वता देवाला अर्चना कराला सोडनात तरीन, अम्च नाव सांगून, म्हण्जे अम्च संकलपांत पुरोहित देवाला अर्चना कराच व्यवस्था आहे.
अर्जी n petition. humble request. भव्यांत विचारणे. विनयांत विचारणे. uis भ्रष्टाचारामळे उद्योगांतून काढूनटाकलते ऐ.ए.एस अधिकारी त्यंच व॑र केलते अन्वेषण बरोर होत नाही अस सांगून, पुन्हा एकदा अन्वेषण करून न्याय विचारत एक अर्जी त्यंच मोठ अधिकारीला म्हण्जे, चीफ़ सेक्रटरीला देले.
अर्जी n a legal plaint. न्यायकचेरीला द्याच अर्जी. uis अम्च वकील बरोर वाद केल नाही-ते-करतां केस हरले. हे कारण सांगून कचेरीच निर्णय पुन्हा विचारणा करिवाला मी वेगळ वकीलावाटी एक अर्जी द्याला योचना करत आहें.
अर्थ n meaning. मुख्य आशय. uis शब्द अथवा पदाच अर्थ द्याच ग्रंथाला शब्दकोश अथवा निघंटू म्हण्तात.
अर्थ करींगणे vt to get to understand. to make sense of. बरोर योचना करींगट्लांपिरी समजींगणे. uis मी कसाला अस बोलतों म्हणून अर्थ करींगट्ला नंतर मला उत्तर दे.
अर्थ होणे vi to understand. समजणे. समजींगणे. uis मी बोलच तला अर्थ होत नाही वाटते.
अर्थभेद अलंकार n metaphor. एकाला उद्देश करून सांगताना तजवर संबंध नसाच वेगळ गोष्ट प्रयोग करणे. uis शब्दालंकारांत अर्थभेद अलंकार पणीन एक.
अर्थशास्त्र n economics. धन अणी व्यापर व्यवसायाच शास्त्र. uis अम्च प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंग अर्थशास्त्रांत थोर पंडित म्हणून सांगातात.
अर्ध n half. दोन पाव. uis कित्येक राज्याच करनीती प्रकार आदायाच अर्ध भाग सरकार कर म्हणून वसूल करतील.
अर्धगछ adv half-done. अर्धंगछ. अर्धवट. अर्ध करून सोडणे. अर्धंपर्द. uis कित्ती सांगीट्लतरीन अम्च कामवाली कापड बरोर धुवत न्होती. अर्धगछ खळबळून घालणामळे सोपाच वास कापडांत केम्हाहीं येत होत॑. सांगून-सांगून पुरे झाल॑. नंतर अम्ही एक "वाषिंग मषीन" घेटलों.
अर्धचंद्र n half-moon. सप्तमीच चंद्र. uis अर्धचंद्र पाह्याच पक्षा मला चंद्रकोर पाह्याला अवडेल.
अर्धरात्री n midnight. मध्यरात्री ; अर्धरात्र in sm. uis अर्धरात्री अष्टमी रोहिणीच दिवस श्रीक्रिष्णाच जन्म झाल॑.
अर्धवट adv half or partially done in an imperfect manner. अर्ध केलते पणीन बरोर करनास्क सोडणे. अर्धगछ. अर्धंगछ. अर्धंपर्द (Kannada). एडवट॑ (Tamil). uis तिरुपतींत नवसून केंस क्षवर कराला हजामाच सोमोर / समोर बसलतर, तो अर्धवट करून जायनास्क पाह्यींगाम. कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला हुडुकींगून गेलतर, तो वापस येया पर्यंतीन तिकडच बसामते पडेल.
अर्धवट adv limbo. in between stage. अर्धांत सोडलते. uis टी.वींत कर्नाटकाच देऊळांच विषयीं एक चोखोट / चोखट कार्यक्रम गेल महिना आरंभ केल्होते. पण ते अर्धवट स्थितींत म्हण्जे, तीन दिवस दाखिवला नंतर, कसालकी सोडूनटाकले.
अर्धवेड n eccentric. विचित्र वागणे. uis मझ वर्लाला अर्धवेड म्हणून निश्चय सांगूया, कारण चोखट / चोखोट सरकारी उद्योग सोडूनटाकून अम्चस्क बनिया कंपनींत घूंसलाहे. ते पणीं उणे धर्मांत.
अर्धक्षवर fig a job left half done. अर्ध करून सोडलते काम/कार्य / विषय. uis हे कॉरपरेशन लोक एक कामीन बरोर करनात. मझ घराच समोरल॑ बीदींत डांबर घालाच काम अर्धक्षवर करून घाट्लाहेत.
अर्धंगछ adv half-done. अर्धगछ. अर्धवट. अर्ध करून सोडणे. अर्धंपर्द. uis पोणावांटा कंट्राक्टर लोकांस एक स्वभाव आहे, काय म्हणजे, कोण्त काम हातांत काढलतरीन अर्धंगछ करून थोडक दिवसाला ते सोडूनटाकतील.
अर्धंपर्द adj half-done. half-hearted (effort). अर्ध करून सोडलते. अर्धगछ. अर्धंगछ॑. अर्धवट. uis तो यंदा परीक्षा बरोर केलनाही. अर्धंपर्द वाचलतर वेगळ काय होईल ?
अर्पणा n offer-up. dedication. अर्पण करणे ; अर्पण in sm. uis त्यंच बाप अकस्मात मरले म्हणून "विश्व कप" क्रिकट खेळ लंडनांत चालत असताना सचीन टेंडूळकर मुंबैला जामते पडल॑. अंतिम संस्कार झाल नंतर वापस येऊन खेळलते पहिलच खेळांतच मारलते सेन्चुरी त्यंच बापाच नावाला अर्पणा करले.
अर्सा n mirror. अरसा. प्रतिबिंब दाखिवाच/दिसाच काच ; अरसा / आरसा / अरशी in sm. uis बंडी पळिवताना रोडांत मागे याच ट्राफ़िक बरोर पाह्याला काराच आंत अर्सा असत॑.
अर्सा n spectacles. अरसा. अयनक. उपनेत्र. बरोर वाचाला / दिसाला उपयोग कराच अर्सा ; चष्मा in sm. uis साधारण होऊन चाळीस वर्षाच वय झालवर वाचालीन लिव्हालीन अर्सा पह्जेस्क॑ अस्त.
अर्सा n plain glass. अरसा. नुस्त अर्सा ; काच in sm. uis मी काल बागांत चालाला गेलतम्हा तिकडे खेळत होतते एक लेंकराच पांयेंत अर्सा रुचूनवेघून सूळांत तरपडत असाच पाह्यलों.
अर्हता n eligibility. योग्यता. uis अठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च॑ देशांत मतदान कराला अर्हता आहे.
अलमारी n cupboard. बीरो. कपाट. uis जुने काळांत लांकडाच अलमारी सुताराकडून करून घेत होतों, तज नंतर गोदरेज अलमारी आल॑, पण अत्ताअग्गीन मलेश्यांतकी चैनांतकी करलते सवंग अलमारी मिळते.
अलक्ष्य adj inattention. गवन नाहीस्क / दाखिवनास्क असणे. ध्यान देनास्क असणे. uis गेलंदा मझ लोंक परीक्षांत उणे मार्क घेटळा म्हणून साळेच प्रिन्सिपाल मला येऊन पाह्याला सांगून पाठिवले. मझ लोंक वाचणांत उणावा दाखिवाच कारण पंतोजी शिकीवताना अलक्ष्य होऊन बसतो अस तेनी मला सांगट्ले.
अलंकार n adornment. beautification. पाह्याला / दिसाला बेष सुंदर करणे. uis अलंकार करींगट्लते पुरे, वराडाला निघला वेळ झाल॑, ये जाऊया.
अलीकडच adj belonging to recent times. recently. थोड पुढे. थोड दिवसाच पुढच॑. uis अलीकडच अतीवृष्टीमळे पाकिस्थान अणी कॅष्मीरांत भयंकर नाश-नष्ट झाल॑.
अलीकडच adj belonging to this side. हे बाजूच. uis अलीकडच देऊळाला जायाला मला एक बीद पणीन वलांडाच आवश्य नाही.
अलीकडे adv recently. हे जवळ uis केंद्र उद्योगमंत्री अलीकडे एक नव॑ उद्योग-नियम विधान-सभांत चर्चाल ठिवले.
अलीकडे adv on this side. हे बाजूकडे. uis कालवाच अलीकडेच जमीनाच मोल अत्ता जास्ती झालाहे.
अलें n ginger plant or its (undried) root. आलें. uis (1) अलें वाळून असलतर तला सुंठ म्हणतों. (2) अम्ही फ्ळोरिडांत कोठकी जात अस्ताना एक बीदीच बाजू ऊंसांतून रस पिळून विकणार एकलाला पाव्हून बंडी राह्ते करलों. अम्हाला पाह्यलकिनीच, भारतांतून येणार लोक॑ सग्ळीन ऊंसाच रसांत अलें चेंचरून घालाल सांगतील, तुम्हालीन तसेच पह्जेका म्हणून तो विचारला.
अल्प adj a little. थोड. थोडक. नंखर. uis मला आंगाला बर नस्ताना आयुर्वेद डॉक्टर देलते औषधाच / ओखदाच चूर्ण जेवून अल्प वेळाच नंतर पाणींत मिळिवून गिळाला सांगिट्ले.
अल्पदृष्टी adj not given to far-sighted thinking. पुढे होयाच विषयावर जास्ती योचना नकरणार. uis अम्च नेतांच अल्पदृष्टीच व्यवहारामळे देशाच स्थिती हाळ होताहे.
अल्पबुद्धी adj narrow-minded. mean minded. ल्हान मनाच. uis राष्ट्रीय कक्षींच अल्पबुद्धीच वागणांमळे समुदायांत गोंधळ पसरते विना वेगळ काहीं उपयोग होत नाही.
अल्पबुद्धी adj of limited intelligence. बुद्धिशक्ती उणे असणार. uis अल्पबुद्धीच लेंकरांस शिकिवाला म्हणून अम्च गांवांत नव॑ होऊन आरंभ करलते साळेंते मझ लेंक उद्योगांत आहे.
अल्पस्वल्प adv whatever little. नंखर थोडक. uis आफ़्रिकाच सोमाळिया देशांत भयंकर क्षाम झालतांमळे लोक जमीनांत काय अल्पस्वल्प मिळाच धान्य (धान), वनस्पती हे सग्ळीन खावून पोट भरींगाच अवस्थाला आलाहेत.
अल्पायुष adj short-lived. उणे आयुषाच. uis स्वामी विवेकानंद, स्रीनिवास रामानुजन असलते महानलोके अल्पायुषाच होते.
अल्पायुष n short life. उणे आयुष. uis (1) रामक्रिष्ण मिषन असल॑ एक थोर संस्था स्वामी विवेकानंदाला त्यंच अल्पायुषांतच स्थापना कराला झाल॑. (2) मनुषांच जीव सरासरि सत्तर वर्ष अस्त. हेज बरोर पाह्ताना कुत्राच सरासरि बारा वर्षाच जीव अल्पायुषाच म्हणूया.
अल्या n worm. अळा. किडा. कीडा. कृमि. uis हे वर्ष अम्च घरच॑ अंबाच झाडांत भरून पंडू झाल॑, तरीन ते पूरा अल्या खाऊन नाश होऊनगेल॑.
अल्लाडणे vi to be forced to run from place to place. निर्बंधामळे पळापळी होणे. uis मझ॑ लोंक दहावा वर्ग संपिवून अक्रावा वर्गाला मिळाच समयांत मला वेगळ गांवाला ट्रान्सफर झाल॑. नव॑ साळेंत मिळिवाजोरी मी अल्लाडूनगेलों. Note. from Tamil.
अळस n sloth. laziness. (शों)सोंबेरिपण. uis तला काय काम सांगिटलतरीन अळस भोगींगून तजांतून चुकाच वाट पाह्त असतो /अस्तो.
अळा n worms that infest fruits and grains. फळ, धान्यांत येयाच किडा. कृमि ; अळ / अळी / अळई in sm. uis (1) उदंड दिवस तांदूळ अथवा दाळ उपयोग करनास्क ठिवलतर तजांत अळा येऊनजात॑. (2) चार मिर्सिंगा नाही, थोड करेपाकाच पान /पत्ता तांदूळाच डब्बांत घालून झांकून ठिवलतर अळा येईना.
अळा n any maggot (in general). किडा. कृमि. पूचि. uis गुलाबाच झुडूपाला अळा येईनास्क॑ असाला तम्हा-तम्हा औषध / ओखद शिंपडत असाम.
अळु n a variety of edible tuber. colocasia. अळूच गड्डे. मूळाच एक गड्डे. uis अळु घेताना बरोर पाव्हून घेम / घेंव, कां म्हणजे कित्येक वर्गाच अळु खालतर घसाला कंड (खाज) येईल.
अवकाश n scope or chance or right (to act). हक्क. uis भारताच राष्ट्रपती देशाच प्रथम नागरीक झालतरीन विधानसभाच शिपारीश / संम्मत नाहीस्क नव नियम कराच अवकाश त्यांस नाही.
अवगणना n disregard bordering on disrespect. मर्यादा देनास्क परवा करनास्क असणे. uis पाकिस्थानाच राष्ट्रपती तिकडल॑ प्रधान नागरीक होऊन पणीन ते राज्याला संबंध झालते मुख्य निर्णय सग्ळीन तिकडल॑ सेनाप्रमुख, राष्ट्रपतीला अवगणना करून काढतात अस सर्वानीं कळ्ळतेच.
अवगणना n neglect. काहीन करनास्क॑ सोडूनटाकणे. uis लेंकरांच वाचणे अवगणना करलतर तेनी थोरळे होताना चोखट / चोखोट उद्योग मिळाला कष्टी भोगतील.
अवघड adj wastrel. a lazy person who wastes time or money. कसालीं प्रयोजन नाहीते मनुष. uis ल्हानपणांत तज बाप-माय तला बरोर पाह्यींगट्ले नाही-ते-करतां अत्ता तो एक अवघड झालाहे.
अवघड adj boorish and illmannered. मूर्खपणाच. uis मझ घरच दुसर॑ माडी अत्ता-अत्ता खाली झालाहे. भाडेला अवघड मनुष कोणीन येताने अस मी देवाला दिवसोडि प्रार्थना करतोंहें.
अवघड adj complicated and problematic. गुंतागुंतीच (प्रश्न). uis (1) त्रिणमूल कांग्रस पार्टी अणी पश्चिम बंगाळाच कम्यूणिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) हे दोनीन "माओ" प्रश्नाच मध्ये पडून ते अण्खीन अवधड स्थितीला घेऊन गेलाहेत. (2) स्वातंत्र्य मिळाल नंतर केंद्र सरकार "ट्रैबल" म्हण्जे, आदिवासींच सामूहिक उद्धार हेज वर ध्यान बरोर देल नाही-ते-कारणामळे देशाच मध्य भागांत कम्यूणिस्ट पार्टी (माओ) यांच प्रश्न एक अवधड स्थितींत जावून पावलाहे.
अवड n liking. इष्ट. इच्छा ; आवड in sm. uis (1) तुला तज बरोर जायाला अवडल तर जा, अवडना तर जाणे नको. (2) आज करलते खीर फार बेष / बेश होत॑. लेंकरे अस्कीन अवडींगून खाले.
अवडणे vi & vt to like. इष्ट वाटणे. इष्ट होणे ; आवडणे in sm. uis इथपर (इत्तिपर) मला काय अवडते, हे पाव्हून एक प्रयोजनीं नाही. तुला काय अवडतेकी तेच करत जा.
अवतरणे vi to incarnate. भूलोकांत देव जन्म काढाच. uis भूलोकांत देवाच अवतरणे कां होते, हेज विषीन अर्जुनाला श्रीक्रिष्ण स्पष्टविणी गीतोपदेशांत उपदेश केलाहे.
अवतार n God's incarnation in Earth. देव भूमींत जन्म काढाच॑. uis दहा अवतारांत नौ झालाहे. शेवट्ल॑ अवतार, म्हाण्जे, कल्कि अवतार इथपर / इत्तिपर होईल.
अवतार fig an unseemly dress or appearance. अवघड वेष-भूष. uis अम्ही लेंकरे कोणतरीन त्यांस अवडनाते वेष-भूष घालींगून बसलतर अम्च आजीम्मा सांगतील, "काय अवतार घालींगून बसलाहेस" म्हणून.
अवधूत n one who has no earthly attachments. वैरागी. बैरागी. भूलोकाच विषय सोडलते संत. uis अवधूत संप्रदायांत शिरडी साई बाबा एक महान होते. Note. in Sanskrit अवधूत means "rejected, removed, agitated, cast away" etc.
अवधूत fig irresponsible person. जवाबदारी सोडून बसलते व्यक्ती. uis तो अत्ता-अत्ता सन्यास घेटला अस ऐकून मला आश्चर्य काहीं झाल नाही. कुटुंबाच जवाबदारी सांभाळणे / समाळणे तला एक मोठ प्रयास म्हणून अस्किदनालीन कळ्ळतेच. नुस्त अवधूतास्क हिंडणेच तला इष्ट.
अवमान n insult. disrespect. तुच्छ रीतीच वागणे. अपमान. uis (1) अम्च पक्षा ल्हान स्थितींत असणारांला ते एकच कारणा करतां अवमान दाखिवणे चोखट / चोखोट स्वभाव न्हो. (2) दुसरेंला अवमान दाखिवाच एक चोखोट स्वभाव न्हो म्हणून ल्हान वयेंतूनच लेंकरांला शिकिवाच अम्च जवाबदारी अणी धर्म पणीन आहे.
अवमान n shame. अपमान. लाज. लज्जा. uis अम्च जीवन अम्ही केम्हीन गौरवांत चालीवलतर अवमान भोगाच अवसर कधीन येईना.
अवमान n disgrace. humiliation. अपमान. पह्जती. uis मी तजकडे साधारणपणांत बोलत होतों तरीन, तज मनांत मी तला अवमान करून बोललों म्हणून वाटल॑.
अवयव n part of body. देहाच भाग. आंगाच भाग. uis वैद्यशास्त्र केवढ॑ सुधार झालाहे म्हणजे हृदय, डोळे, मूत्राशय असलते अवयव नाश झाल तरीन शस्त्रक्रीया करून दुसरेंकडून ते अम्च आंगाला जोडाला होईल.
अवलक्षण adj weird looking. पाह्याला विकार असाच. विलक्षण. uis हे काळाच कित्येक पोरी शृंगार करींगतें म्हणून कसकसकी वेष घालींगून तसच, तोंडाला कायकायकी लावींगून अवलक्षण करींगतात.
अवलक्षण n evil omen. ओंगळ / वंगळ लक्षण. uis नव घरांत वेघतानाच घरच॑ दिवा विजलते एक अवलक्षण म्हणून तिला वाटल॑. हेला महत्व काहीं नाही म्हणून कित्ति सांगिट्लतरीन तिन॑ ऐकाला तय्यार न्होती.
अवळा n gooseberry. अंबट रूचाच एक फळ ; आवळा in sm. uis अवळा, अलें, पाला असलते पदार्थ अयितवार (आदित्यवार) संपाकांत मिळिवणे की खाणे की श्रेष्ट नहो अस म्हणणे आहे.
अवळा घालून बेल तोडणे fig a saying denoting "to use a small fish to catch a big fish". to take small initiatives to achieve big results. उणे श्रमांत थोर काम हेणे. uis पाकिस्थानाला भारताच बरोर समोर-समोर युद्ध कराला शक्ती नाही म्हणून आतंगवादींला सोडून अम्हाला उपद्रव कराच, अवळा घालून बेल तोडाच सम म्हणूया.
अवळी-जावळी adj twins. एकेच प्रसवांत दोन लेंकरे ; आवळाजावळा / जुळी-मुले in sm. uis एक दिवस एकच ठिकाणी एकसारख असाच तीन जोडी अवळी-जावळींस पाव्हून आश्चर्य वाटल॑ मला.
अवशिष्ट adj remaining. बाकी असाच. उरलते. uis कुवैत युद्धांत अमेरिका एक पूरा महिना प्ळेनांतून बॉम्ब घालून इराक्की सैन्याला ध्वंस करले अणी तज नंतर इराक्की सैन्याच अवशिष्ट भाग दोन दिवसाचांत आत्मसमर्पण करले.
अवशेष n residue. उरलते भाग. uis (1) जपानाच हीरोषीमा अणी नागासाकी हे दोन पटणाच व॑र ॲटम-बॉम्ब पडून सर्वनाश झाल॑. अवशेष काहीं न्होत. (2) भोपालांत 1986 वर्ष झालते "गॅस ट्रेजडीच" अवशेष अत्ता पणीन लोकांस कष्ट करीवत आहे.
अवश्य adv surely. certainly. अगत्य. कंडिप (Tamil). uis तुम्ही आले विना एक काम पणीन होणार नाही. अवश्य येम (यावा).
अवसर n urgency. समेच / सवेच कराम म्हणून वाटाच. uis तू हे वाटे केम्हातरीन येताना मला एक नारळ, थोडक चिंच, एक किलो तुरीच दाळ अणी सहा काडीचपेटी हे अग्गीन घेईंगून आणाला होईलका ? अवसर काहीं नाही, तुला सौकर्य मिळताना पुरे !
अवसर n opportunity. अनुकूल समय. uis (1) तो एक षाणा / शाणा. अवसर पाव्हून तज काम करींगतो. (2) गेल सात आठ महिना पसून भारताच बरोर चैनाच व्यवहारांत फार व्यत्यास आलाहे. भारताला अवमान कराला मिळाच अवसर कोण्तीन चैना सोडत नाही.
अवसर n occasion. वेळ. समय. uis मझ भाऊच लेंकीच वराड गेल महिना झाल॑. तेच अवसरांत तिज भाऊच मुंज पणीन करूनटाकले.
अवसर n busy. preoccupied. कामामळे वेळ नाहीस्क असणे. uis (1) अत्ता आग्गीन मी उदंड अवसरांत आहें. तरीन, उद्या कृत्य साडे-चार घंटेला आलतर मी तुला पाह्तों. (2) उद्याहीं परमाहीं तुम्ही अवसरांत असतील म्हणजे मी उद्या-नाही-तेरमा येवून पाहिलतर तुम्हाला सौकर्य असेलका ?
अवसर भोगणे vt to show impatience because of urgency. आतर दाखिवणे. uis (1) ट्रैन निघाला अण्खीन उदंड वेळ आहे. स्टेषनाला अम्ही बरोरल वेळालच जाऊन पावाला जातों, अवसर भोगनाकांत. (2) तुला ट्रैनाला वेळ झाल म्हणून मला कळ्ळ॑. अवसर भोग नोको. मी तुला बरोरल समयाच पुढे स्टेषनांत सोडतों. Note. आतुर in sm means 'eager'
अवसान n the end. शेवटीच (भाग). uis रात्री उशीर झाल-ते-करतां अम्ही सिनिमाच शेवटी पतोरी राह्यलों नाही. खाणीच अवसान दुसर दिवस विचारींगून कळींगट्लों.
अवस्था n state. condition. स्थिती. uis वैरल जेरामळे मझ मित्राला काल हॅस्पिटलांत मिळिवले. आज त्यंच अवस्था कळाला मी जाऊन पाह्मे.
अवस्था n enduring (difficulty). (कष्ट) भोगणे. uis अम्च खेडेगांवांत डांबराच पक्का बीद नाही. प्रति वर्ष पाऊसाळाच समय पटणांतून सामान आणाच सग्ळ॑ बैलबंडीईं चिक्कोलांत सांपडींगाच अवस्था पाह्याला होत नाही.
अवंतण n respectful invitation. आमंत्रण. भव्यांत स्वागत करणे. स्वागताच चिट्टि / पत्र / कागद ; आवंतणे / औंतण / औतण in sm. uis शतरंजांत विश्वांत सर्वउंच स्थानांत असणार श्री. विश्वनाथन आनंदाला एक होनररि डोक्टरेट देऊन मर्यादा कराला हैदरबाद विश्वविद्यापीठ आवंतण पत्र पाठिवले. पण, केंद्र मानुषिक विकास मंत्रालयाच अधिकारींच मूर्खपणामळे ते होनररि डॉक्टरेट त्यास द्याला झाल नाही.
अवंदर adj disorderly. untidy. cluttered. helter-skelter. तेरा-पेरा. uis त्यंच घराच "प्लान" बर आहे. तसच, त्यंच "फ़रनीचर" पणीन भेष आहे. झाल तरीन घर अवंदरांत / अवंदर होऊन ठींगट्लाहेत. Note. from Kannada.
अविकारी adj indeclinable (gram). विकार होयाला साध्य नाहीते गोष्ट. अव्यय.(व्याकरण)
अवियल n a dish made from a variety of vegetables. विध-विध रीतीच भाजीपाला घालून कराच एक पदार्थ. uis केरलांत कोण्त होटलांत जेवाला गेलतरीन अवियल निश्चय होऊन मिळल. Note. from Malayalam.
अवेळ v inappropriate time. अशुभ वेळ. योग्य नाहीते वेळ. uis कोण्त तरीन चोखोट /चोखट काम कराम म्हण्जे, राहु काळास्क अवेळ काळांत करताने म्हणतील.
अव्यय n indeclinable (gram). विकार होयाला साध्य नाहीते गोष्ट. अविकारि.
कअशुद्ध adj polluted. शुद्ध नाहीते. मळक. uis नदींच बाजू असाच पट्णांचीं गांवांचीं मोरींत्सून येयाच मळक /घाणक पाणी नदींत मिळून देशाच सर्व नदीईं अशुद्ध झालाहे.
अशुद्ध adj impure. शुद्ध नाहीते. मळक. uis सोळावा शतक पर्यंतीन हे दोनाचीन मध्ये व्यत्यास काहीं न्होते तरीन, सत्रावा शतकाच नंतर तंजाऊर मराठी अणी पुणे मराठी वेगळ वेगळ गतींत पुढे गेल॑. असूनीं, लोकांच मनांत तंजावूर मराठी पूणे मराठीच एक अशुद्ध रूप आहे अस एक चूक अभिप्राय आहे.
अशुभ adj inauspicious. शुभ नाहीते. uis दुर्योधनाच जन्म एक अशुभ वेळांत झाल म्हणतात.
अशुभ n bad omen. अशुभ चिन्ह. अशुभ शकुन. uis घर सोडून बाहेर जाताना एक ब्राह्मण सोमोर / समोर आलतर ते एक अशुभ शकुन आहे अस म्हणणे आहे.
अशोक n name of a tree. एक झाडाच नाव. uis लंकापुरींत रावणासुर सीतादेवीला अशोक वनांत कैद करून ठिवल्होता.
अशोक adj cheerful. संतोष. शोक नसणे. uis "अशोक" हे शब्दाच अर्थ "शोक नाहीते" म्हणून कळनास्कच भरून लोक त्यंच लेंकरांच नाव अशोक म्हणून ठिवींगतात !
अश्रद्धा n inattentive. अलक्ष्य. श्रद्धा दाखिवनाते. uis कोण्तीन एक विषय बरोर मनांत अर्थ होम म्हणजे ते ऐकताना / वाचताना अश्रद्धांत अस्ताने.
अश्लील adj obscene. अश्लील. uis कित्येक टी.वी कार्यक्रम एवढे अश्लील अस्त म्हण्जे, तसलते अस्कीन पूरा "सेन्सर" करणेच चोखोट / चोखट.
अश्व n horse. घोडा. uis अश्व रूप हयग्रीव महाविष्णू श्री वादिराजतीर्थाकडून प्रसाद घेऊन खाले म्हणून मध्व परंपराच लोके विश्वास करतात.
अश्वगंधा n a plant with medicinal properties. एक औषध झाडाच नाव. uis अश्वगंधा झाडाच वाळिवलते मूळाच पूडांतून आयुर्वेद औषध / ओखद करणे आहे.
अश्वथ n pipal tree. पिपळ झाड. uis हिंदू धर्म संप्रदायांत अश्वथ वृक्षाला एक महत्व स्थान आहे.
अश्वमेध n horse-sacrifice. घोडाला बलि देवून कराच एक यज्ञाच नाव. uis जुने काळांत भरतवर्षांत अश्वमेध यज्ञ प्राबल्यांत होत॑ अणी महाभारतांत युद्धाच नंतर पांडव हे यज्ञ करलते सांगिट्लाहे.
अश्विनी n name of a star. एक नक्षत्राच नाव. uis ज्योतिषशास्त्रांतल॑ सत्तावीस नक्षत्रांत पहिलच नक्षत्र.
अष्ट n eight. आठ. uis हिंदू संप्रदायाच अनुसार आठ दिशा (दिक्) आहे अणी हे अष्ट दिशालीन दिक्पालक असतात.
अष्टमी n eighth day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षांतल आठवां दिवस. uis एक एक पक्षांतीन नवमीच पुढे अष्टमी येत.
अस adv in this manner. thus. हे प्रकार ; असा / अशी in sm. uis तू मझकडे अस बोल नोको, मर्यादा देऊन बोल.
अस adj of this type. हे मादरीच. असल॑. असलते. हे प्रकारच. uis मी दाखिवाच लुगडे सारख मिळ्ल नाहीतरीन परवा नाही, अस असाच कोण्त मिळतेकी ते आण.
असट adj dilute. thin. अस्सट. नित्तळ. uis डांगर कालिवताना बरोरल घट्टी असनास्क असट होऊनगेलतर तज रूच हाळ होईल.
असटभाजी n gravy curry. नित्तल भाजी. uis अम्ही पंजाबी पदार्थ विकाच होटलाला जाताना दोन घट्टिभाजी अणी एक असटभाजी विचारून घेतों.
असणे vi to be. असणे. uis (1) एक गुंप होऊन बाह्येर गामाला /गावांला जाताना त्यंच-त्यंच सामानाच व॑र त्यंच-त्यंच गवन असणे चोखोट. (2) तुम्ही षाणे / शाणे असुया. पण, तो एक ढेंग म्हणून सांगून तला अवमान कराच आवश्य न्होत॑.
असणे vi to exist. असणे. uis गुळ्चीट अंबाचांत कीडा असणे सहजेच.
असणे vi to stay. to reside. राहणे. uis तुम्ही अम्च गांवांला / गामाला येतांत अस मला कळ्ळ॑. कोठ असतांत म्हणून मला कळिवलतर मी तुम्हाला येऊन पाह्तों.
असणे vi to remain. to retain. (बाकी) उरणे. (बाकी) ठिवणे. uis आजच खर्च सोडून, हातराखणाला पांचशे रुपे असणे चोखोट / चोखट.
असतस adj so-so. of nothing special. सुमार. साधारण ; असातसा in sm. uis फार बेष आहे, नव॑ डिसैनाच आहे अस म्हणून तिन दीड /देड लाख रुपे देऊन घेट्लते नव सोनेच माळ मला दाखिवली. मला कायकी ते अवडल॑ नाही, असतस आहे.
असतस adv by hook or by crook. somehow or the other. कसतरीं. कसकी. चुकून-माकून ; असातसा in sm. uis तो वाचणांत षाणा काहीं न्हो. असतस एस.एस.एल.सी संपीवलतेच / जिंतलतेच एक थोर विषय म्हणून सांगुया.
असत्य n falsehood. lie. लटक. लबाड. uis असत्य बोलणारांस पाह्यलतर मला अवडनाच अवडना.
असत्य n unreal. माया. uis श्री शंकराचार्यांच अद्वैत सिद्धांताप्रकार हे ब्रह्मांड एक असत्य अथवा माया आहे.
असनास्क adj (as if) not existing or prevailing. न असून. uis काहीन असनास्क अस्तानाच तो एवढे पैसवंत म्हणून सांगींगतो. खरेच असलतर काय सांगलकी ?
असभ्य adj indecent. vulgar. असभ्य. uis पूरा रात्री घरच समोरल बीदींत दोन पीकोरांच / पीखोरांच असभ्य गोष्ट ऐकून मला कंटाळा वाटल॑.
असभ्य भाषा n slang. असंस्कृत गोष्ट. uis अक्रावां शतकांत कश्मीर देशांत सोमदेवकवी संस्कृतांत कथासरितसागरा रचना करले. हे महाग्रंथांत असाच अनेक कथा सातवां शतकांत पैशाची म्हणाच एक असभ्य भाषांत गुणाध्या लिव्हलते बृहतकथांतून काढलते म्हणून पंडितलोक सांगतात.
असमाधान n discontent. समाधान नसणे. uis पैसेच वेड असणारांला ते कित्ती असलतरीन मनाला समाधान असना, म्हण्जे सदा तेनि / त्यनि असमाधानांत अस्तील.
असमाधान n displeasure. संतोष नसणे. uis अम्ही समुदायांत वागताना कित्येकदा अम्हाला इष्ट नाहीते कायतरीन होईलच. तसल॑ वेळ अम्च असमाधान व्यक्त कराच पुढे बरोर योचना करणे चोखोट.
असल adj original. genuine. मूल रूपाच. यथार्थ रूपाच. uis बाज़ारांत नकली औषध /ओखद विकणे सर्वसाधारण झालाहे-ते-करतां असली ओखद विकाच दुकान कळींगून ठिवणे चोखोट / चोखट.
असल adj of this type or kind. हे मादरीच. हे प्रकारच. असलते ; असला in sm. uis यंदा तू घेईंगून आणलते अंबा बेष होत॑. इथपर /इत्तिपर असलतेच आण.
असल-असल adj etcetera. etc. हेच सार्ख अण्खीन वेगळ वेगळ. uis मी सांगिट्लते तुला बरोर समजल नाहीतर मी दाखिवाच लुगडे प्हा, अणी ते दुकानांत असल-असल वेगळ कित्ती असल तरीन आण.
असल-तसल adj of one type or the other. एक मादरीच नाही, अण्कीएक मादरीच. एक रीतीच नाही, अण्कीएक रीतीच. एक विधाच नाही, अण्कीएक विधाच. uis तू सिंगपूराला जाऊन येताना मी विचारलते मोबैल-फोणेच आणाम / आणांव, ते मिळ्ल नाही म्हणून असल-तसल काहीं आण नोको.
असलास्क-असून adv without any prior hint. all of a sudden. अकस्मात. पुढे काहीं कळिवनास्क. uis तला मनाच प्रश्न काहीं न्होत तरीन असलास्क-असून वेड धरल॑ अस मी ऐकलों.
असाधारण adj rare. uncommon. extraordinary. उदंड अप्रूप. फार अप्रूप. uis तो एक असाधारण बुद्धीवंत. तज पूरा वाचणे स्कॉळरषिपांतेच झाल॑.
असाध्य adj that which is impossible to attain or get. साध्य होयनाते. uis तू बरोर प्रयत्न केल नाहीतर तुला ते काम मिळणे असाध्य होईल.
असामान्य adj extraordinary. फार विशेषाच. असाधारण. uis इषोबशास्त्रांत श्रीनिवास रामानुजन एक असामान्य मनुष होते.
असुख n mental or physical discomfort or distress. आंगाच अथवा मनाच कष्ट. uis (1) तुम्च कुटुंबाला एवढ॑ दिवस फार कष्ट सोसामते पडले म्हणून ऐकलों. तुम्ही अण्खी तुम्च कुटुंब हे असुखांतून लोक्कर / लोकुर सु्टलतर अम्ही अस्किदनालीन उदंड संतोष वाटेल. (2) चार दिवसापसून पंतोजी साळेला आल नाहीत. विचारताना, तेनी असुख होऊन हॉसपिटलांत आहेत म्हणून कळ्ल॑.
असुया ind be it. may be. uis (1) तो बोलाच सगळीन लबाड / लटक असुया म्हणींग नोको. (2) काल घेट्लते दहा अंबांत दोन-तीनांत कीडा वेघलते असुया.
असुर n demon. राक्षस. uis पह्यिल पह्यिल म्हणजे, ऋगवेदाच काळाच आरंभांत असुर अणी सुर अस दोन वर्गाच देव होते. पण जातां-जातां असुर म्हणाच गोष्टाच अर्थ बदलून "राक्षस" म्हणून झाल॑. Note. It is probable that this change happened due the application of a grammatical rule as per which when "अ" is prefxed to a word it gets transformed to its antonym.
असूया n envy. jealousy. दुसरांच सुख, संतोष पाव्हून मनाला कष्ट वाटणे. पोटजाळ. uis दुसरेंला पाव्हून असूया वाटाच पक्षा, अम्हालीन संतोष सुख हे सग्ळीन बरोरल वाटेंत कस मिळूया हे योचना कराच एक सात्विक गुण आहे.
असूं n tear drops. आंसूं. डोळेंतून गळाच पाणी ; अश्रू in sm. uis (1) तीन दिवसापसून मझ उजव डोळे तंबड होऊन असूं गळत आहे, डोळे-डॉक्टराला दाखिवालापणीन मला वेळ नाही. (2) अग्गिदनांसीन होयास्क मझ बहिणीला (बहीणाला) कांदा चिरताना डोळेंतून असूं येईना.
असौकर्य adj inconvenience. कराला सौकर्य नसाच. uis मला कोयंबत्तूरला अवसरान जाम॑. मी गांवांत नसताना मला एक दोन कागद येऊया. तुम्हाला असौकर्य नाहीतर ते घेऊन ठिवाला होईलका ?
अस्कीन pron everything. all. अस्गीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहीं. uis हे खोली अत्ताच खाली करून देम॑. आंत असाच सामान अस्कीन काढून बाहेर ठिवा. Note. (1) अख्खा in sm means "full" / "entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि / अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अस्गीन pron everything. all. अस्कीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहीं. uis यंदा अम्च घरच॑ अंबाच झाडांत सुमार दोनशें अंबा मिळ्ळ॑. त्यांत पोणावांटाहीं मठाला देऊनटाकून उरलते अस्गीन कापून लोणचे घालूनटाकलों. Note. (1) अख्खा in sm means "full"/"entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि / अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अस्तमन n setting (of Sun, Moon or stars). (सूर्याच /चंद्राच /नक्षत्राच) अस्तमान ; अस्तमान / अस्त in sm. uis बीदीच दिवा नसताना सूर्याच अस्तमन झालांपिरी बाहेर हिंडणे अपाय आहे.
अस्त्र n arrow. बाण. धनुषांतूं सोडाच आयुध / शस्त्र. uis महाभारत, रामायण असलते महाकाव्यांत ब्रह्मास्त्राला सगळ्याचीन पक्षा शक्तिशाली अस्त्र म्हणून सांगिट्लाहे.
अस्तिवार n foundation. पाया. uis घर अथवा एक बांधणी घट्टि असाम /असांव म्हणजे तज अस्तिवार बरोर असाम.
अस्ती n bone. हड. अस्थी. uis कोटानकोटी वर्षाच पुढे भूलोकांत जीवंत होतते डैनॅसरांच अस्थि मातीच आंत तेवढ॑ वर्षीन झांकून असून कालभेदामळे फॉसिल होत॑, अस जीवशास्त्रज्ञ सांगतात.
अस्ती n residual bones and ashes after cremation. अस्थी. शवसंस्कार करून उरलते चिताभस्म. uis शवसंस्काराच नंतर स्मशानाला (श्मशानाला) जाऊन पुढच॑ कार्यक्रमाला अस्थि वेंचून काढणे आहे.
अस्थिविसर्जन n ritual disposal of the remains of cremation ashes in sea or river. अस्तिविसर्जन. शवसंस्काराच नंतर अस्थि समुद्र अथवा नदींत मिळिवाच विधि. uis बंगळूरांत असणार लोके साधरण होऊन श्रीरंगपटणांत कावेरी नदींत अस्थिविसर्जन कराला जातात.
अस्थी n bone. हड. अस्ती. uis कोटानकोटी वर्षाच पुढे भूलोकांत जीवंत होतते डैनॅसरांच अस्थि मातीच आंत तेवढ॑ वर्षीन झांकून असून कालभेदामळे फॉसिल होत॑, अस जीवशास्त्रज्ञ सांगतात.
अस्थी n residual bones and ashes after cremation. अस्ती. शवसंस्कार करून उरलते चिताभस्म. uis शवसंस्काराच नंतर स्मशानाला (श्मशानाला) जाऊन पुढच॑ कार्यक्रमाला अस्थि वेंचून काढणे आहे.
अस्पष्ट adj unclear. स्पष्ट नाहीते. अव्यक्त. व्यक्त नाहीते. uis परालिटिक स्ट्रोक झाल नंतर त्यंच बोली फार अस्पष्ट झालाहे.
अस्वस्थ adj restless. ill at ease. अशांत. uis तीन महिना पसून तला मनांत गोंधळ होत असाच मी पाह्त आहें. मनाच अस्वस्थतामळे रात्री झोंप येत नाही अणी झोंपीच मात्रा घेत आहें म्हणून मला सांगिट्ला.
अस्विज n seventh month of Saka year. हिंदू पंचांगांत सातवां महिना. uis नवरात्रीच सण अस्विज महिनांत येत॑.
अहंकार n haughtiness. pride. conceit. egoism. अहंभाव. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ मनुष म्हणींगणे. uis अहंकार असाच मनुषाला दुसरेंच चोखट / चोखोट उपदेश पणीन तज मनाला बरोर पडल नाहीतर इष्ट होईना.
अहंकारी adj one who is haughty, proud, conceited or egoistic. गर्विष्ट. uis रावण अणी हिरण्यकषिपु हे दोनीं मोठ अहंकारी राक्षस होते.
अहंभाव n haughtiness. pride. conceit. egoism. अहंकार. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ मनुष म्हणींगणे. uis अहंभाव असणार त्यंचस्कच अण्कीन एक व्यक्तीला पाह्यलतर लोक्कुरच वरडा-वरडी आरंभ होईल.
अहिंसा adj non-violence. हिंसा विरुद्ध. दुसरेंना हिंसा करनास्क असणे, हे सिद्धांत. uis भारताच संस्कारांत अहिंसा सिद्धांत बौध अणी जीन धर्मांतून आलते अस एक अभिप्राय आहे. कां म्हाण्जे, हे दोन धर्म स्थापना होयाच पुढे वेदकाळांत हिंदू पूजा पद्धतींत मांस उपयोग करत होते.
अहेर n gifts given at a wedding etc. वराडांत द्याच बक्षीस / दान. आहेर. uis वराडाला बलावाला येतानाच (आमंत्रण पत्र द्याला येतानाच) अहेर पणीन द्याच संप्रदाय अत्ता हे काळांत आरंभ जालाहे.
अहो ind a vocative used while addressing a person with respect. मर्यादांतूं एक व्यक्तीला बलावाच एक गोष्ट. uis एक दोन पिढीच पुढे दल्लाला बाईल अहो म्हणून बलावाच सहज होत॑ तरीन, हे काळांत नाव सांगून बलवाच पद्धती आरंभ झालहे.
अक्षण n arathi done by two ladies for bestowing blessings to people (not to gods) with haldi-kumkum-akshata mixed with water in a brass / silver plate but without a lamp /camphor. हळदी-कुंकू अक्षताच पाणीच ताटांत (विना वाताच / कापूराच दिवा) लोकांला आशीर्वाद कराच एक विधाच ओवाळणे. uis अठांगुळाच वेळी गरवार बायकोला अक्षण करणे आहे.
अक्षता n a caste mark applied on the forehead by men of Madhwa sect signifying consuming of food as God's prasad after morning puja. पाष्टच देवपूजा झालांपिरी तीर्थप्रसाद घ्याच वेळी मध्व संप्रयादाच दादिगे /दाद्ग्ये कपाळांत लावाच चिन्ह. uis (1) मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच कपाळांत अक्षता घालींगट्लाहेत म्हण्जे त्यंच पाष्टेच पूजा झाल॑ म्हणून अर्थ. (2) वाळून पूड करलते केळीच फूलाच चिप्पाहीं हळेदहीं मिळिवून अक्षता कतात. (3) एकादशीच दिवसी अक्षता लावणे नही.
अक्षता n the paste used for applying the caste mark of the same name. अक्षताच मिश्रण. uis अत्तच काळांत, म्हणजे शीघ्र-शीघ्र ऑफीसाला पळामस्क असाच काळांत अक्षता कराला वेळ मिळना म्हणून पुढेच तयार करून ठिवलते अक्षताच मिश्रण दुकानांतून घ्याला मिळते.
अक्षय adj imperishable. perpetual. कद्धीहीं नासनाते. कद्धीहीं असाच. uis त्यंच घरांत दिवसाला कित्तीदन आलेतरीन जेवण वाढतील. त्यंचकडे अक्षयपात्र आहेकी कायकी !
अक्षर n letter of an alphabet. अक्षरमालांतले एक स्वर / व्यंजन. uis कन्नड अणी तेलुगु लिपीच अक्षर पाह्याला जवळ जवळ एक सारख अस्त.
अक्षरमाला n alphabet. एक भाषाच स्वर अणी व्यंजन लिपीच समूह. uis इंग्ळीष भाषाच अक्षरमालांत वीसाव॑र-सहा अक्षर आहे.
अक्षराभ्यास n learning of the alphabets. अक्षरमाला शिकणे. uis सरकारी नियमाप्रकार लेंकरांला साळेंत मिळिवाला त्यांस उणे पक्षा सहा वर्षाच वय झाल असाम म्हणून आहे तरीन, पोणावांटादनीन त्यंच लेंकरांला चार पांच वर्ष असतानाच अक्षरमाला शिकिवाला आरंभ करूनटाकतात.
अक्षराभ्यास n the ceremony of initiating a child to education. लेंकरांस लिव्हणे-वाचणेंत प्रारंभ करिवाच सण. विद्यारंभ. uis हिंदू धर्म संप्रदायाप्रकार नवरात्री सणाच शेवटल॑ तीन दिवस सरस्वतीपूजा आचरण करताना तज शेवटल॑ दिवसी म्हणजे, विजयदशमीच दिवसी लेकरांस अक्षराभ्यास शुभकार्य आरंभ करिवणे आहे.
अक्षौहिणी n a huge army formation of foot, cavalry, chariots and elephants of ancient times. जुनेकाळच सैन्यांच एक महासंग्रह. uis महाभारत युद्धांत पांडवांच सैन्यांत सात अक्षौहिणी अणी कौरवांच सैन्यांत अक्रा अक्षौहिणी होत॑ म्हणून महाभारत महाकाव्याच आदिपर्वांत आहे. Note. according to Adi Parva 2.15-23 of Mahabharatha one akshauhini consists of 21,870 elephants, 21,870 chariots, 65,610 horses and 1,09,350 foot soldiers.
अज्ञात adj incognito. anonymous. स्वंत रूप कोणालीन दाखिवनास्क. uis बारा वर्षाच वनवास झाल नंतर पांडव एक वर्ष अज्ञातवास विराटराजाच अधीनांत केले.
अं thirteenth vowel in Dakshini Marathi. दक्षिणी मराठी अक्षरमालाच तेरावां स्वर.
अंक n a numerical figure. numeral(s) of a number. अंक. uis अरबी-अंक म्हणून पश्चिम देशांत बारावां शतकांत प्रसिद्ध झालते संख्यामाला वास्तव होऊन भारतांत फार जुने काळांतच प्रयोगांत होत॑.
अंक n an act of a play or drama. नाटकाच भाग. uis नाटकांत एक-एक अंक आरंभ होतानहीं संपतानहीं वेदीच पर्दा घालणे अणी काढणे होत अस्त.
अंगण n court-yard. घराच पुढच नाहीतर मध्य भागांतल मोकळ (उघड) ठिकाण. uis साधारण होऊन घरच अंगणांत तुळसी-ब्रिन्दावन अस्त.
अंगप्रदक्षिणा n circumambulation by rolling on the floor around the sanctum sanctorum of a temple in fulfillment of a vow. नवस करून देऊळाच गर्भगृहाच प्राकारांत साष्टांग निजून प्रदक्षिणा करणे. uis तिरुपतींत मझीं मझ थोरळे भाऊचीं मुंज झालतम्हा अम्ही दोघीन देऊळाच गर्भग्रहाच (गर्भगुडीच) प्राकारांत अंगप्रदक्षिणा करलों.
अंगरका n shirt. अंगर्का. अंगरखा. अंगी. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र ; अंगरखा / अंगराखा in sm. uis केम्हीन मी पॅन्ट शिंपीकडून शिवून घेतों अणी अंगरका दुकानांतून रेडीमेडाच घेतों. Note. better अंगरखा.
अंगरखा n shirt. अंगर्का. अंगरका. अंगी. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र ; अंगरखा / अंगराखा in sm. uis अम्ही लेंकरे असताना दोनकी तीनकी गुंडी असाच अंगरखा डोस्के वरून घालास्क शिवत होते. अत्ता हे काळाच अंगरखाला पांचकी सहाकी गुंडी अस्त अणी ते पुढे पटीस पूरा उघड॑ अस्त म्हणून डोस्केच वरून घालाच आवश्य नसते. Note. from अंग (torso) and राखणे (to protect).
अंगर्का n shirt. अंगरका. अंगरखा. अंगी. uis रेडीमेड अंगर्का घेताना केम्हाहीन मला थोडक पाव्हून घेमतेस्क अस्त, कां म्हणजे चाळीस अथवा चाळीसाव॑र-दोन नंबराच अंगर्काच मला बरोर पडेल, पण दर कंपनीच चाळीस अणी बेचाळीस नंबरांत व्यत्यास अस्त. Note. better अंगरखा.
अंगवस्त्र n cloth covering torso of a man. upper cloth. अंगोस्त्र. अंगोस्तर. अंगूस्त्र. दाद्ग्ये आंगाच वरच भागांत पांघरिवून नेसाच कापड. uis (1) पूजा नाही, काहीं शुभकार्य करताना दादिगे / दाद्ग्ये अंगवस्त्र अणी वेष्टी / धोती नेसूनेच कराम / करांव अस आहे. (2) केरळच देऊळांत जाताना अंगी अणी पॅन्ट नेसाला सोडनात. तज बद्दिल वेष्टी / धोती अणी अंगवस्त्र नेसाम / नेसांव. Note. from अंग (torso) and वस्त्र cloth)
अंगारा n sacred residue of coal cinders after saligrama puja and offering of nevedya to Lord Narayana. साळिग्राम पूजा अणी नेवेद्य /नैवेद्य झाल नंतर सगडींत शांत झालते कोळसा. uis मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच आंगांत गोपीचंदन लावलते ठिकाणी अंगारा लावतात. Note. the sacred cinder is applied wherever gopichandana has been applied on their body by Madhva brahmin men.
अंगी n man's shirt. अंगर्का. अंगरका. अंगरखा. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र. uis अनंतशयन श्री पद्मनाभास्वामी देवस्थानाच आंत जाम / जांव म्हणजे दादिगे त्यंच अंगी उकलून धोती नेसींगून जाम / जांव.
अंगीकार n espouse. acknowledge. admit. संमत. uis ऐक्य राष्ट्र संघटनाच (UNO) अंगीकार झाल नंतर अमेरिका इर्राक युद्ध आरंभ केले.
अंगुठ n thumb. हाताच मोठ बोट ; आंगठा / अंगठा in sm. uis श्स्त्र-विद्यांत अर्जुनाच बरीस कोणीन असताने म्हणून एकलव्याकडून तज अंगूठ कापून गुरुदक्षिणा म्हणून द्याला द्रोणाचार्या विचारले.
अंगुठ n toe. पांयाच मोठ्ठ बोट ; आंगठा / अंगठा in sm. uis नियंत्रण नाहीस्क होतते डयबीटिसामळे मझ अम्माच गॅगरीन झालते अंगूठा कापून काढूनटाकले.
अंगूस्त्र n cloth covering torso of a man. upper cloth. अंगवस्त्र. अंगोस्तर. अंगोस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघ्रिवून / पांघरिवून नेसाच कापड. uis दादिगे अनंतशयन श्री पद्मनाभस्वामी देवस्थानाच आंत वेघाम म्हणजे अंगी काडूनटाकाम.
अंगोठी n finger ring. मुदी ; आंगठी in sm. uis साधारण होऊन अंगोठी डाव॑ हातांतल॑ बोटांत घालतों.
अंगोस्तर n cloth covering torso of a man. upper cloth. अंगोस्त्र. अंगू्स्त्र. अंगवस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघ्रिवून / पांघरिवून नेसाच कापड. uis बंगळूरांत पेजावरश्री यांच विद्यापीठांत असाच श्री राघवेन्द्रस्वामीला कनकाभिषेक कराच एक-एकदनांसीन मंत्राक्षताच बरोर अंगोस्त्रर सम्मानास्क देतील.
अंगोस्त्र n cloth covering torso of a man. upper cloth. अंगवस्त्र. अंगोस्तर. अंगूस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघरून नेसाच कापड. uis आंगावर अंगोस्त्र नोको म्हणून अस्ताना कित्येकदन ते काडून माद / माज गुंडाळींगून बांदींगतील / बांदतील.
अंघूळ n bathing. पाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघोळी. आंघूळ. आंघोळ. स्नान. नाहणे. uis अंघूळ कराच खोलीला नाहणी म्हणतों. Note. the different spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857)
अंघोळी n bathing. पाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघूळ. आंघोळ. आंघूळ. स्नान. नाहणे. uis खेडेगांवांच लोके अंघोळीला कुंड नाहीतर नदीला जाणे आहे.
अंजली n offering made with palms held together to form a cup. वाटीच आकारांत दोन हात जोडून अर्पणा करणे. uis फूल दोन हातांतीन काढून अंजली द्याचाला पुष्पांजली म्हणतों.
अंजीर n figs. एक फलाच नाव. uis अंजीर फळाच गुळचीट वाळतां वाळतां जास्ती होत जाईल.
अंड n egg. अंडे. मुट्टे (Tamil) ; अंडे /अंडी in sm. uis कोंबडेच अंड दिवसोडी एक एक खालतर आंगाला चोखट / चोखोट म्हणतात.
अंडे n egg. अंडे. मुट्टे (Tamil) ; अंडे /अंडी in sm. uis कॉलेज हॉस्टलांत मझ मित्र एकला होता. तो दिसोडी तीन अंडेच ओमलेट विना वेगळ काहीन पाष्टेच पलहाराला खायना.
अंत n end. अवसान. शेवटी /शेवट uis ब्रह्मांडाच अंत कस होईल हे कोणालीन योचना कराला होयना.
अंतकरण n deep seated compassionate feeling. मनाचांतल गाढ करुणाच विचार. uis तो एक क्रूर मनुष. दूसरेंच विषीन तला अंतकरण काहींनच नाही.
अंतकाल n last days before death. मराच पुढले समय. uis दिव्यज्ञान असणारांस त्यंच अंतकाल कळेल म्हणून सांगतात.
अंतकाल n last days. शेवटलच थोड दिवस. uis मुगळ साम्राज्याच अंतकाल झाल नंतर अम्च देशाच एक मोठ भाग मराठांच स्वाधीनांत आल॑.
अंतरपट n the ceremonial curtain held between the bride and the groom before tying the mangalasutra in a Hindu wedding. वराडाच वेळी गरसोळी बांधाच पुढे नवरा-नवरींच मध्य अडवे धराच पर्दा ; अंतरपाट in sm.
अंतरात्मा n internal soul. the sentient soul. आंतले आत्मा. जीवात्मा. uis अंतरात्माचीं देहाचीं योग कस कराच, हे रहस्य जुने काळ पसून ऋषीनीं-मुनीनीं योगाभ्यास वाटे प्रसिद्ध केल्होते.
अंतरीक्ष n atmosphere. वायुमंडल. uis एक ग्रहांत जीव उद्भव / उत्पत्ति होयाला तज आवश्य प्रकारच अंतरीक्ष अवश्य पह्जे.
अंतर्ज्ञान n inner (spiritual) knowledge. दिव्यज्ञान. uis अंतर्ज्ञान वाढिवणे, हे धर्माच एक प्रधा्न उद्धेश आहे.
अंतिम adj final. शेवटीच. शेवट्ल॑. uis विनायक चतुर्थीच दिवसी गणेशाच विग्रहाला विसर्जन कराच ते दिवसच अंतिम कार्यक्रम आहे.
अंत्यकर्म n last rites. मरला नंतर कराच कर्म. uis हिंदू धर्म प्रकार देह सोडून परलोकाला जायाच आत्माच मोक्षाकरतां अम्ही कराच अंत्यकर्मांत वैकुंठसमाराधना एक मुख्य भाग आहे.
अंत्ययात्रा n funeral trip. अंतिमयात्रा. मरल नंतर स्मशानाला घेऊन जायाच यात्रा. uis विध-विध आचार-विचार अनुसरण करणार लोके, मृतदेहाच अंत्ययात्रा त्यंच-त्यंच वर्गाच दंडकाच प्रमाण करतील.
अंथरणे vt to spread a sheet, mat or bedding. (निजाला अथवा भोईं वर बसाला) जमखाण, चांपा, अंथरूण पसरणे. uis जानवासाच दिवस लोकांस बसाला जमखाण अंथरूण ठिवाला /अंथराला मी नवरीच घरचे लोकांस सांगिट्लों.
अंथरूण n mattress. bed. निजाला उपयोग कराच एक साधन. अण्थूण. लेप. नाहिली. uis वसति /वसती जास्ती नाहीते लोकांच घरांत पाष्टे अग्गीन अंथरूण गुंडाळून एकपटीस ठिवतील अणी रात्री निजाच वेळी ते काडून कोठ सौकर्य आहेकी तिकडे अंथरतील.
अंथरूण-पांघरूण n a full set of bed with mattress, blanket, pillows etc. अण्थूणाचीं पांघरिवणाचीं पूरा व्यवस्था. uis अम्च घरांत चार लोकांला निजाला अंथरूण-पांघरूण सदा अस्त.
अंधळ adj blind. डोळे दिसनाते ; आंधळा in sm. uis (1) अम्च गांवांत अंधळ लेंकरांस शिकिवाला एक साळे / शाळे उघडाच विषय बोलून तीन वर्षाच नंतर ते निज / खरे झाल॑. (2) मी ल्हान अस्ताना अम्च घराला एक अंधळ भीकारी वारा-वार येत होतते अत्ता पणीन मझ सयेंत आहे.
अंधविश्वास n superstition. blind faith. आधार नाहीस्क कराच विश्वास. uis मोठ वाचणे-लिव्हणेच मनुष झाल तरीन कित्येक विषयांत तज अंधविश्वास पाह्ताना मला आश्चर्य वाटत॑.
अंधार n darkness. उजाड नाहीस्क असाच स्थिती. uis अत्ता अस्कीन दिवसाला तीनदपा "पवर-कट" होत आहे. रात्रीच वेळ अंधारांत लेंकरांस वाचाला उदंड कष्ट होत म्हणून मी एक इनवर्टर घेट्लों.
अंबट adj sour. अंबट रूच ; आंबट in sm. uis बरोरल अंबट असाच अंबांतून केलते लोणचे फार रूच अस्त !
अंबटकोळ्ळि adj extremely sour. उदंड अंबटाच. uis हे दहीं मला वाढ नको. उन्हाळांत ते अंबटकोळ्ळि झालाहे !
अंबटभाजी n a liquid preparation usually made of greens or cabbage or pumpkin eaten with cooked rice. पाला (कीरे-Tamil) अथवा कॅबेज अथवा भोंपळाच कालवण. uis दक्षिणी मराठी लोकांला सगळ्यांचीन पक्षा अवडाच कालवण अंबटभाजी म्हणून संशय नाहीस्क सांगूया.
अंबा n mango. एक पंडूच नाव ; आंबा in sm. uis हिरव॑ / हिर्व असताना म्हणजे, पिकनास्क असताना फार अंबट असाच अंबाच वर्ग पिकला नंतर फार गुळ्चीट होईल.
अंबा n Goddess Durga. दुर्गादेवी. uis पार्वती देवीला, अंबा, दुर्गा, ललिता अस अनेक रूपांत हिंदू लोक आरधना करतात.
अंबारी n caparisoned seat on an elephant. हत्तीच पाठीवर बसाला बांधाच व्यवस्था. uis मैसूर दस्सराच वेळी चामुंडी देवीच विग्रह अंबारी बांधलते हत्तीच वर ठिवून जंबू-सवारी कराच दृश्य तिकडल॑ उत्सवाच एक मुख्य भाग आहे.
अंश n a portion. a part. भाग. चूर. uis पांडवांला देशाच एक ल्हान अंश पणीन द्याला दुर्योधना तयार न्होता.
Comments