top of page
ऐका हो यशोदाबाई....
by P.M. Padma Prasad
  • Aikaho Yasodabai

ऐका हो यशोदाबाई
तुमच लोंकाच खोडी, तुमच लोंकाच खोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑* तोडी**.
*(pole ?, वासा is pole) **(तोडला=broke)  

ऐका हो यशोदाबाई 
तुमच लोंकाच खोडी, तुमच लोंकाच खोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी.

नाहत होतें आंगणांत॑
आला हो तथे, झटकरी* आला हो तथे
शेंडी धरूनी घालून गेला दोनी डोळ्यांत॑.
*(झटक=quickly)

नाहत होतें अंगणांत॑
आलाहो तथे, झटकरी आला हो तथे
शेंडी धरूनी घालून गेला दोनी डोळ्यांत॑.

सून होते मझ॑ घरी
त्यानी सुंदरी, त्यानी फार सुंदरी
धरूनियूं ओढून आला त्यंच पदर॑.
* (धरूनी)

सून होते मझ॑ घरी
त्यानी सुंदरी, त्यानी फार सुंदरी
धरूनियूं ओढून आला त्यंच पदर॑.

ऐका हो यशोदाबाई
तुमच लोंकाच खोडी, तुमच लोंकाच खोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी.

स्नानाला गेली मझ॑ नारी, आला हो तथे,
झटकरी आला हो तथे.
दूरूनी या खडी मारून फोडी* घागरी.
* (फोडला=broke)

स्नानाला गेली मझ॑ नारी, आलाहो तथे,
झटकरी आलाहो तथे
दूरूनी या खडी मारून फोडी घागरी.

ऐका हो यशोदाबाई
तुमच लोंकाच खोडी, तुमच लोंकाच खोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी.

यमुनाच तीरा ओर गाडी सोडूनी,
रगडी गाडी सोडूनी
आईच पोटाओर॑ नरडी चेंचाच भारी

ऐका हो यशोदाबाई
तुमच लोंकाच खोडी, तुमच लोंकाच खोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी.
दहीं दूधाच मडकी फोडी, वासर॑ तोडी. 
 

home-button.png
नीज माझ॑, सागर शयना.....

by P.M. Padma Prasad

  • Neej Majha Sagara Shayana...

नीज माझ॑, सागर शयना,
          बाळा जोजोरे.
नीज माझ॑, सुंदर वदना,
          बाळा जोजोरे.
क्रिष्णा, बाळा जोजोरे.

गो रूप धरून आले शरण॑
सोसूवन भार॑ (भार सोसून)
दैत्य उत्पत झाले आले 
घेऊनी अवतार॑
आले घेऊनी अवतार॑


देवकी वासु देव तपस॑,
केले हो नीट॑.
यांच उदरी, आले हरी
घेवूनी अवतार॑,
आले, घेवूनी अवतार॑.

रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी,
शंखु चक्र हाती,
अवतार केले, यदुपतीनी,
पुष्प वृष्टी करतील.
धन्ये, पुष्प वृष्टी करतील.

धन्य धन्य हो,
यमुना बाई उगुनी आली
शरण सेवा करूनी या
मागूनी वाट देली
हरुषी, मागूनी वाट देली

यशोदाच अंथरूण॑,
निजवीले थान॑ (स्तन, थान देणे = breast feeding),
सम झाल॑ परतून॑,
दुर्गी घेवून॑,
आले, दुर्गी घेवून॑. 

नीज माज॑, सागर शयना,
          बाळा जोजोरे.
नीज माझ॑, सुंदरा वदना,
          बाळा जोजोरे.
क्रिष्णा, बाळा जोजोरे.
 

bottom of page