top of page
home-button.png
भाऊबीज

Marathi greetings on the occasion of भाऊबीज. Dakshini Marathi translation & voice-clip

by Ananda Rao Vasishta 

प्रत्येकाला एक बहिण असावी

(MM version)

प्रत्येकांसीं एक बहिण असांव॑

(DM version)

click to hear

मोठी, लहान, शांत, खोडकर
कशीही असावी
पण एक बहिण असावी.

मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या

पाठीमागे लपणारी.

मोठी असल्यास गुपचूप
आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी .
लहान असल्यास
चुपचाप काढून घेणारी.

लहान असो वा मोठी ,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी.
एक बहिण प्रत्येकाला असावी.

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर
कान ओढणारी .
लहान असल्यास
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.

लहान असो वा मोठी आपल्याला
एक बहिण आसावी.

आपल्या एकाद्या मैत्रिणीला
"वहिनी" म्हणून हाक मारणारी
एक बहिण प्रत्येकाला असावी.

मोठी असल्यास प्रत्येक
महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी.

ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही
तितक्याच ओढीने राखी
पसंत करून आणणारी.
एक बहिण प्रत्येकाला असावी.

कठीण प्रसंगी खंबीर राहील
स्त्री शक्तीच ती ,
स्वतःपेक्षा हि जास्त
आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी......!

भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा...

वडील, धक्टी, शांत, खोडीखोर
कसहीं असूनदे,
पण, एक बहिण असांव॑.

वडील असली तर बाप-माये कडून
वांचिवणारी,
चुमणी असली तर लपणारी
मागेपटीस, अम्च॑.

थोरळी असली तर गपचुप
ठिवणारी पैसे जेबांत अम्च॑.
ल्हान असली तर जेबांतून
काढणारी पैसे गपचुप.

ल्हान, नाही, थोरळी
ल्हान-ल्हान गोष्टांलीं भांडणारी
असांव॑ एक बहिण प्रत्येकांसीं.

थोरळी असली तर चूकाला
कान अम्च॑ पिळून ओढणारी,
चुमणी असली, "सॉरी अण्णा"
म्हणणारी चूकाला तिज॑.

धक्टी अथवा थोरळी
असांव॑ एक बहीण प्रत्येकांसीं.

विशेष स्नेही अम्च॑ हिला,
"वहिनी" अस॑ सांगणारी तिन॑
एक बहिण असांव॑ प्रत्येकांसीं.

थोरळी असली तर, प्रत्येक महिनालीं
नव॑ कापड॑ आणणारी,
धक्टी असली तर, प्रत्येक धर्मांतूनीं
काढणारी चंदा अम्च॑ जेबांतून स्वता

ओवाळणी कां देणे हिला 
स्वता नको अस॑ म्हणूनीं
अपार प्रेमांत राखी
अवडून आणणारी
असांव॑ एक बहिण प्रत्येकांसीं.

हट्ट मनाच, कधी-कधी दृढ, तरीन
स्त्री-शक्तीच आहे तिन॑
स्वतापक्षा अम्हालाच
करणारी प्रेम जास्ती तिन॑,
असांव॑ एक बहिण प्रत्येकांसीं.....!

भाऊबीजाच॑ मनापसून शुभेच्छा.....

bottom of page